कर्नाटकातील हेब्बल येथील सिंधी हायस्कूलने आपल्या इयत्ता 7 वीच्या पाठ्यपुस्तकात अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamnna Bhatia) वरील धडा समाविष्ट केला आहे. हा मजकूर ‘सिंधच्या फाळणीनंतर भारतीय लोकांचे जीवन’ या सिंधी समुदायावरील एका अध्यायाचा भाग आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ते मुलांसाठी अयोग्य असल्याचा युक्तिवाद करतात. एवढेच नाही तर कुटुंबीयांनी याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे.
तक्रार दाखल करणाऱ्या एका पालकाने सांगितले की, ‘मुलांना दुसऱ्या संस्कृतीची ओळख करून देण्यास आमचा आक्षेप नाही, पण आमचा आक्षेप एका अभिनेत्रीवर आधारित अध्याय सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अयोग्य आहे, याला आहे.’ कर्नाटकातील इंग्रजी माध्यम शाळांचे असोसिएटेड व्यवस्थापन (KAMS) पालकांच्या तक्रारींची चौकशी करत आहे. KAMS ने स्पष्टीकरणासाठी शाळा आणि CBSE बोर्ड या दोघांशी संपर्क साधला आहे. संबंधित शाळा प्रशासनाने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
KAMS सरचिटणीस शसीकुमार डी म्हणतात की तमन्ना भाटियाचे काही चित्रपट मुलांसाठी अयोग्य असू शकतात. अभ्यासक्रमात त्याचा उल्लेख केल्यास विद्यार्थ्यांना अयोग्य ऑनलाइन मजकूर समोर येऊ शकतो. शशीकुमार डी सुचवतात की सिंधी समुदायातील अधिक संबंधित कामगिरी हायलाइट केल्या पाहिजेत. तपास सुरू असून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
तमन्ना भाटियाने तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि हिट गाण्यांसह तिला खूप प्रशंसा देखील मिळाली आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री येत्या काही दिवसांत नीरज पांडेच्या ‘ओडेला 2’ या चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
हिना खान देत आहे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘मी सामना करत आहे..’
या बिग बॉस स्पर्धकांवर लागला होता खोट्या लग्नाचा आरोप, शहनाजपासून राखीपर्यंतच्या नावांचा यादीत समावेश