दक्षिण आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तमन्ना भाटियाला (Tamannaah Bhatia) ओळखले जाते. नुकताच अभिनेत्रीचा तेलगू चित्रपट ‘F3’ हिट झाला आहे. दरम्यान अलिकडेच तिने उघड केले आहे की, तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी भीती स्मृती गमावणे आहे. सध्या मुंबईत शूटिंग करत असलेल्या या अभिनेत्रीने मंगळवारी (५ जुलै) आपल्या शूटिंगच्या ठिकाणी पोहोचण्याची वाट पाहत, ट्विटरवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे ठरवले.
या संवादादरम्यान, तिला एक प्रश्न विचारण्यात आला की, तिची सर्वात मोठी भीती कोणती आहे? यावर तमन्नाने उत्तर दिले, “आपली स्मरणशक्ती गमावणे.. अरे, भीतीदायक वाटते.” तसेच अभिनेत्रीने तामिळ चित्रपट ‘धर्मदुराई’मधील शुभशिनी आणि ‘बाहुबली’ मधील अवंतिका ही आतापर्यंत साकारलेली सर्वात खास पात्रे म्हणून निवडली. वास्तविक जीवनात कोणत्या काल्पनिक पात्राला भेटण्यासाठी ती सर्वात जास्त उत्सुक असेल असे विचारल्यावर तमन्ना म्हणाली, ‘शेरलॉक होम्स.’ या संवादात तमन्नाने या प्रश्नाचे उत्तरही दिले की, तिला चॉकलेट जास्त आवडते की आईस्क्रीम? याला उत्तर देताना अभिनेत्रीने सांगितले की, तिला ‘चॉकलेट आईस्क्रीम’ आवडते. (tamannaah bhatia reveals her biggest fear)
तमन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ही अभिनेत्री दक्षिणेतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. याशिवाय ती ‘हिम्मतवाला’, ‘तुतक तुतक तुतिया’ यांसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्येही दिसली आहे. आता ही अभिनेत्री ‘बोले चूड़ियां’, ‘प्लॅन ए प्लॅन बी’, ‘बबली बाऊन्सर’ या तीन हिंदी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा