अवघ्या १५ व्या वर्षी चित्रपटांमध्ये पदार्पण केलेल्या तमन्ना भाटियाला ‘या’ सिनेमाने दिली अभूतपूर्व प्रसिद्धी


मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने वयाच्या १५ व्या वर्षी तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. जरी तिचा पहिलाच चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाला असला तरीही तिने धीर सोडला नाही आणि ती पुढे जात राहिली. तमन्ना मंगळवारी (२१ डिसेंबर) तिचा ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग तमन्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.

तमन्नाचा (Tamanna Bhatia) जन्म २१ डिसेंबर १९८९ रोजी झाला. तमन्नाने वयाच्या १५ व्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या चित्रपटात अभिनय केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. त्यानंतर तमन्नाने काही व्हिडिओ अल्बममध्येही काम केले. मग पुढे तमन्ना तेलगू आणि तमिळ चित्रपटांकडे वळली. २००५ मध्ये तमन्नाने ‘श्री’ चित्रपटात काम केले होते. तमन्नाने तिच्या टॅलेंटच्या जोरावर एकामागून एक चित्रपट मिळवले. लवकरच तमन्ना दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीची मोठी स्टार बनली.

तमन्ना २०१३ मध्ये हिंदी चित्रपटांमध्ये परतली. तिने अजय देवगणसोबत साजिद खानच्या ‘हिम्मतवाला’ सिनेमात काम केले. हा सिनेमा सपाटून आपटला. त्यानंतर २०१४ मध्ये तिचा सैफ अली खानसोबत ‘हमशकल्स’ हा चित्रपट आला. या चित्रपटात तमन्नाने मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तिने अक्षयसोबत ‘एंटरटेनमेंट’ या चित्रपटातही काम केले. तमन्नाचे काही चित्रपट हिट तर काही फ्लॉप झाले, पण तमन्नाची लोकप्रियता अबाधित राहिली. ‘बाहुबली’ चित्रपटात काम केल्यावर तमन्नाला जबरदस्त ओळख मिळाली. या चित्रपटातील तमन्नाचे काम सर्वांनाच आवडले होते.

तमन्नाला सर्वाधिक ओळख मिळाली ती ‘बाहुबली’ चित्रपटात काम केल्यानंतर. या चित्रपटातील तमन्नाचे काम खूप आवडले होते. ’बाहुबली’मध्ये प्रभाससोबत तमन्ना मुख्य भूमिकेत होती. ‘बाहुबली २’ मध्ये तमन्नाचा एक छोटासा सीन होता. यावरून तमन्ना चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यावरही नाराज होती. तमन्ना म्हणाली की, दिग्दर्शकाने तिचा सीन छोटा केला. तमन्नाची कमाई सध्या करोडो रुपये आहे.

गेल्या वर्षी तमन्ना भाटियाला चित्रपट मिळत नसल्याच्या बातम्याही आल्या होत्या. तमन्नाला चित्रपटांपेक्षा आयटम साँगच्या ऑफर्स जास्त येत होत्या. माध्यमांतील वृत्तानुसार, तमन्नाला गेल्या दोन वर्षांत काही चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. यादरम्यान तिने चित्रपटांमध्ये विशेष गाण्यांवर डान्स केला. ज्यात कन्नड चित्रपट ‘जगुआर’, ‘केजीएफ चॅप्टर १’, महेश बाबूचा चित्रपट ‘सरिलेरू नीकीवारु’ यांचा समावेश होता.

हेही वाचा :

अशाप्रकारे शूट झाला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील रोमॅंटिक सीन शूट, प्रार्थनाने केला व्हिडिओ शेअर

नवीन घराच्या बाल्कनीमध्ये रोमॅंटिक झाले कॅटरिना आणि विकी, शेअर केला क्युट फोटो

लग्नानंतर अंकिता लोखंडेने शेअर केला गृह्प्रवेशाचा व्हिडिओ, पत्नीची साडी सांभाळताना दिसला विकी 


Latest Post

error: Content is protected !!