ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर या गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या विळख्यात अडकल्या होत्या. कोरोनाशी लढा देत शेवट आज (२५ मे) साडे पाच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे आज संपूर्ण तमाशा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
कांताबाई सातारकर या 82 वर्षाच्या होत्या. त्यांची मुले,मुली ,जावई आणि नातवंड देखील तमाशा क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या मुळच्या साताऱ्याच्या आहेत. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी तमाशा क्षेत्रात पदार्पण केले.
तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे दुःखद निधन ???????? भावपूर्ण श्रद्धांजली. ???????? pic.twitter.com/kr8ZcEOu9L
— प्रसिद्ध महाराष्ट्र तुतारी वादक श्री हरिदास गुरव (@GURAVHARIDAS) May 25, 2021
कांताबाई या मुळच्या साताऱ्याच्या असल्या तरीही त्या संगमनेर येथे स्थायिक झाल्या होत्या. त्यांनी तुकाराम खेडकर यांच्याशी विवाह केला, त्यानंतर त्यांनी अनेक वगनाट्यात काम केले. त्यांनी तमाशा क्षेत्रात त्यांचे खूप नाव कमावले आहे.
मराठी रंग भूमीवर अनेक पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका साकारल्या आहेत. पण सहसा कोणतीही स्त्री पुरुषांची भूमिका साकारताना दिसत नाही. पण कांताबाई यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज, छ्त्रपती संभाजी महाराज या सारख्या थोर पुरुषांच्या भूमिका रंगभूमीवर हुबेहूब साकारल्या आहेत.
कांताबाई यांचे पती तुकाराम खेडकर यांनी कांताबाई सातारकर यांच्यासह मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ या नावाने स्वतःचा तमाशा फड चालू केला. कांताबाई या तमाशाचा वारसा घेऊनच जन्माला आल्या होत्या. छोट्या मोठ्या तमाशात काम करून एक नवीन स्वप्न उराशी बाळगून त्या मुंबईला गेल्या. मुंबईत गेल्यावर त्यांच्या मधील अस्सल कलाकार बाहेर आला.
https://twitter.com/officer_ashwin/status/1397246140559642628?s=20
तुकाराम खेडकर यांनी कांताबाई सातारकर यांच्या जोडीला अमाप प्रेम मिळाले. वगनाट्याद्वारे अनेक सामाजिक संदेश देणारी ही जोडी महाराष्ट्रात लोकप्रिय झाली होती.
मागील एका वर्षापासून कोरोना काळ असल्याने गावो गावच्या यात्रा बंद झाल्या आहेत. त्यामुळे अनेक तमाशा कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत सरकारने मदत देखील केली आहे.