समज आणि गैरसमज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नात्यामध्ये अथवा कोणत्याही एखाद्या गोष्टी विषयी असलेला समज आणि गैरसमज खूप काही बदलून टाकतो. गैरसमजामुळे अनेकदा एखाद्या प्रतिष्टीत व्यक्तीच्या चारित्र्यावर बोट उठवले जाते. यामुळे त्याच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात मोठा परिणाम होतो. भावना दुखावल्या गेल्याने ती व्यक्ती कधी मोठा आक्रोश ही करते. सध्या इंटरनेटचे युग सुरु आहे. इथे अनेक नेटकरी पूर्ण माहिती न घेताच ती अनेकांपर्यंत पोहचवतात. त्यामुळे बऱ्याचदा ती माहिती अफवेच्या स्वरूपात व्हायरल होते. परिणामी ज्या गोष्टीबद्दल अथवा ज्या व्यक्तीबद्दल ती माहिती पसरवली जाते त्याची बदनामी देखील होते. असाच काहिसा प्रकार घडला आहे अभिनेता सिद्धार्थ सूर्यनारायण बरोबर.
समज आणि गैरसमज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नात्यामध्ये अथवा कोणत्याही एखाद्या गोष्टी विषयी असलेला समज आणि गैरसमज खूप काही बदलून टाकतात. गैरसमजामुळे अनेकदा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या चारित्र्यावर बोट ठेवले जाते. त्यांच्याबाबत अनेक अफवा देखील उठवल्या जातात. यामुळे त्याच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात मोठा परिणाम दिसून येतो. सध्या इंटरनेटचे युग सुरु आहे. इथे अनेक नेटकरी कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती न घेताच ती चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहचवतात. कोणत्याही माहितीची शहानिशा न करता चुकीची माहिती पसरवणे देखील एक गुन्हा आहे. असाच काहीसा प्रकार घडला आहे, साऊथ अभिनेता सिद्धार्थ सूर्यनारायण सोबत.
https://twitter.com/Actor_Siddharth/status/1433423447783182338?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1433423447783182338%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.ibtimes.co.in%2Ftamil-actor-siddharth-narayans-fake-death-news-mistaken-identity-intentionally-targeted-fans-840364
नुकतेच बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेता असणाऱ्या सिद्धार्थ शुक्लाचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्याच्या निधनानंतर त्याचे फॅन्स, कलाकार आदी अनेकांनी त्याला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली वाहताना त्याच्या आठवणींना उजाळा देताना काहींनी त्याचे फोटो पोस्ट केले होते. अशात काही नेटकऱ्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी सिद्धार्थ शुक्लाला सोडून दाक्षिणात्य चित्रपटांतील अभिनेता सिद्धार्थ सूर्यनारायणलाच श्रद्धांजली वाहिली. हे खूपच धक्कादायक आहे. इतकी मोठी चूक करताना कोणत्याही नेटकाऱ्यानी आपली पोस्ट आणि फोटो तपासून पाहिला नाही. तसेच काहींनी त्याचे फोटो शेअर करत त्याच्याविषयी खूप चुकीची माहिती लिहिली.
नेटकऱ्यांनी पसरवलेल्या या मोठ्या अफवेमुळे सिद्धार्थने दुःखी होऊन एक पोस्ट शेअर केली. त्याने त्यामध्ये लिहिले की,”हे ट्विट आणि हे त्याच्या प्रतिक्रिया कदाचित आता, तरी कुणाला यावरून आश्चर्य वाटणार नाही. माझ्याकडे या प्रकारावर शब्दच नाही.” एका युजरने सिद्धार्थचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये RIP असे लिहिले आणि रडण्याचे इमोजी टाकले. एका यूजरने, तर कहरच केला. त्याने कमेंटमध्ये असे लिहिले की,” देवाने सिद्धार्थ शुक्ला ऐवजी सिद्धार्थला न्यायला पाहिजे होते.”
सिद्धार्थने हे सर्व त्याच्या पोस्टमध्ये शेअर करत लिहिले की,” मला लक्ष करून माझ्या विषयी सगळीकडे एवढा मोठा द्वेष पसरवला जात आहे. ही गळचेपी आहे. मी काय होतो आणि आता काय झालो?”
अभिनेता सिद्धार्थने बॉलीवूडमध्ये २००६ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘रंग दे बसंती’मध्ये अभिनय केला आहे. त्याने या मध्ये भगतसिंग यांचे पात्र साकारले होते. या चित्रपटामध्ये त्याच्यासह आमिर खान, कुणाल कपूर, सोहा अली खान, आर माधवन आणि शरमन जोशी आदी कलाकार होते.
तत्पूर्वी अभिनेता सिद्धार्थ शुक्लच्या पार्थिवावर ३ सप्टेंबर रोजी ओशिवरा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. लवकरच त्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला की. त्याच्या निधनाचे खरे कारण समोर येईल.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…










