सोशल मीडियावर सक्रिय राहण्याच्या बाबतीत सर्वच चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आघाडीवर असतात. त्या आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बारीक- सारीक गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तसेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. यामध्ये एका तमिळ अभिनेत्रीचाही समावेश आहे. ही अभिनेत्री इतर कोणी नसून शालू शम्मू आहे. तिने आपल्या अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने अभिनेत्री शालूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शालू आपल्या बोल्ड आणि हॉट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या समुद्रकिनाऱ्यावरील एका फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
शालूने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत, जे चाहत्यांना खूपच भावले आहेत. विशेष म्हणजे तिचे हे फोटो टॉपलेस आहेत. टॉपलेस फोटोशूटच्या बाबतीत तिने बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीलाही मागे टाकले आहे. कियारानेही यापूर्वी टॉपलेस फोटोशूट केले होते.
शालू या फोटोत एकदम हॉट अंदाजात दिसत आहे. तिचे जलवे पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. तसेच अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
शालूचे हे फोटो तमिळनाडूच्या मुत्तुकडूमधील एका रिसॉर्टमध्ये क्लिक केले आहेत. या फोटोमध्ये शालूने लाल रंगाची स्कर्ट घातली आहे आणि वर लहान फुलांचा गुच्छा पकडला आहे. सोशल मीडियावर तिने हे फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, “तुमच्यातील कमतरता त्या हृदयासाठी चांगल्या आहेत, जे फक्त तुम्हाला प्रेम करण्यासाठी बनले आहे.”
तिच्या या फोटोंवर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी तिला ट्रोलही केले आहे.
शालूने आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने सन २०१९ मधील सिवा कार्तिकेयन दिग्दर्शित ‘मिस्टर लोकल’ सिनेमातही काम केले आहे. मागील वर्षी तिचा ‘इरांदम कुत्थू’ सिनेमाही रिलीझ झाला होता.
सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांबद्दल बोलायचं झालं, तर तिला इंस्टाग्रामवर जवळपास ४ लाखांपेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-