Tuesday, February 18, 2025
Home अन्य Drugs Mastermind : धक्कादायक! आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा मास्टरमाइंड निघाला तामिळ चित्रपट निर्माता

Drugs Mastermind : धक्कादायक! आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा मास्टरमाइंड निघाला तामिळ चित्रपट निर्माता

टॉलीवूडमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(NCB) आणि दिल्ली पोलिसांच्या टीमने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज ट्रॅफिक(Drugs Mastermind) नेटवर्क चालवणाऱ्या तीन व्यक्तींना अटक करण्यात आली असून ५० किलो ड्रग्ज जप्त केले आहे. तर कारवाईतील धक्कादायक बाब म्हणजे ड्रग्ज ट्रॅफिकिंग नेटवर्क चालवणारा मास्टरमाईंड एक तमिळ फिल्म प्रोड्यूसर आहे. त्यामुळे सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे.(Tamil film producer mastermind of ₹ 2,000 crore drug )

वाळलेल्या नारळामध्ये ठेवून स्यूडोफेड्रिन न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाठवले जात असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. स्यूडोफेड्रिन केमिकल हेल्थ पावडर म्हणून आणि वाळलेल्या नारळामध्ये ठेवून बाहेर देशात पाठवले जात होते. समुद्री मार्गाने ही ट्रॅफिकिंग होत होती. या गँगचा मास्टरमाईंड एक तमिळ फिल्म प्रोड्यूसर आहे. तो सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याला पकडल्यानंतर स्यूडोफेड्रिनच्या मुळ स्रोताचा शोध लागेल. असे सांगण्यात आले आहे.

एनसीबी डेप्युटी डायरेक्टर जनरल (DDG) ग्यानेशवर सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या लोकांनी कबुली दिली आहे. अटक केलेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षात त्यांनी स्यूडोफेड्रिनचे शिपमेंट केले आहे. यामध्ये आतापर्यंत ३,५०० किलो स्यूडोफेड्रिन बाहेर देशात पाठवण्यात आले आहे. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २ हजार कोटी इतकी आहे.

एनसीबीच्या प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज नेटवर्क भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया या देशांमध्ये पसरलेले आहे. केलेल्या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतून ५० किलो स्यूडोफेड्रिन जप्त करण्यात आलेत. स्यूडोफेड्रिनचा वापर मेथामफेटामाईन करण्यासाठी केला जातो.

स्यूडोफेड्रिन हे काय आहे?

तसेच, १५ फेब्रुवारी रोजी गोदामात मल्टीग्रेन फूड मिश्रणाच्या खेपेमध्ये स्यूडोफेड्रिन पॅक करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यानंतर दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि एनसीबीच्या संयुक्त पथकांनी या परिसरात छापा टाकला, ज्यामुळे ५० किलो स्यूडोफेड्रिन जप्त करण्यात आले.

एनसीबीने सांगितले की, स्यूडोफेड्रिन हे एक विशेष रसायन आहे जे मेथॅम्फेटामाइन तयार करण्यासाठी वापरले जाते. जे जगभर आवश्यक औषध आहे. ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुमारे ₹ १.५  कोटी प्रति किलो दराने विकले जाते. स्यूडोफेड्रिन हे अत्यंत व्यसनाधीन सिंथेटिक औषध आहे.

हे कायदेशीररित्या कमी प्रमाणात वापरले जाऊ शकते. भारतात त्याची विक्री अतिशय नियंत्रित पद्धतीने केली जाते. त्याचे उत्पादन, व्यवसाय, निर्यात आणि वापर यावर काटेकोर नजर ठेवली जाते. स्यूडोफेड्रिनचा बेकायदेशीर ताबा आणि व्यापार एनडीपीएस कायद्यानुसार 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आहे.

हेही वाचा: 

Janhvi Kapoor: ‘मला स्वतःचीच लाज वाटते’, देवरा शुटींगदरम्यान जान्हवी कपूर असं का म्हणाली?

चोर निघाला दिलदार! मणिकंदन यांच्या घरातून चोरीला गेलेला राष्ट्रीय पुरस्कार, चोराने माफी मागून परतवला

 

हे देखील वाचा