Wednesday, July 3, 2024

संगीतकार डी. इमानने दुसरे लग्न केल्यानंतर पहिल्या पत्नीने दिली धक्कादायक प्रतिक्रिया म्हणाली ‘मीच मुर्ख आहे…’

लोकप्रिय दक्षिणात्य चित्रपट संगीतकार डी इमानने (D.imman) अमेलियाशी लग्न केले आहे. अमेलिया ही तमिळ अभिनेता उबाल्डची मुलगी आहे. डी इमानचे हे दुसरे लग्न आहे. डी इमानने 2020 मध्ये पहिली पत्नी मोनिका रिचर्डसोबत (Monika Richard) घटस्फोट घेतला होता.. डी’इमानने 14 मे रोजी अमेलियाशी लग्न केले. त्याच दिवशी, डी’इमानच्या घटस्फोटित पत्नीने ट्विटरवर एका पोस्टद्वारे याबद्दल मत व्यक्त केले आहे . डी इमानचे मोनिकासोबत १२ वर्षांचे वैवाहिक नाते होते. मोनिकाने आपल्या आयुष्यातील किती वर्षे डी’इमानसोबत वाया घालवली आहेत असे धक्कादायक विधान केले आहे. तसेच हा तिचा सर्वात वाईट काळ होता असेही तिने म्हणले आहे.

मोनिका रिचर्डने व्हेरिफाईड अकाउंटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये धक्कादायक विधान केले आहे. ज्यामध्ये तिने “प्रिय, इमान तुझ्या दुस-या लग्नाबद्दल अभिनंदन. आयुष्यात एखाद्याची जागा घेणं तुझ्यासाठी इतकं सोपं असेल, तर मला वाटतं की मीच मूर्ख आहे, ज्याने तुझ्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर इतकं काही केलं. मी माझ्या मुलांना तुझ्यापासून वाचवू शकेन याची खात्री करून घेईन. आणि गरज पडली तर नवीन मुलालाही तुझ्यापासून वाचवीन.” असे धक्कादायक विधान केले आहे.

डी इमानने चेन्नईमध्ये अमेलियासोबत एका इंटिमेट सेरेमनीमध्ये लग्न केले. लग्नानंतर डी इमानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ज्यामध्ये तिने “मी माझ्या वडिलांचे आभार मानतो जे वाईट काळात माझ्या पाठीशी उभे राहिले. हे लग्न माझ्यासाठी एक उपाय आहे. आयुष्यात येणाऱ्या सर्व आव्हानांमध्ये, हे आनंदासारखे आहे. माझ्या कुटुंबाने पाहिले आहे. गेल्या काही वर्षांत खूप वाईट गोष्टी घडल्या. या लग्नात मी माझी दिवंगत आई मंजुळा डेव्हिड यांचे आशीर्वादही घेतले आहेत.”

दरम्यान डी इमान हे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यात ‘कुमकी’, ‘जिला’, ‘रोमियो ज्युलिएट’, ‘मिरुथन’, ‘विश्वासम’ आणि ‘टेडी’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय डी इमानने रजनीकांत यांच्या अन्नाते या चित्रपटासाठी संगीत दिले होते. रजनीकांतचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा