Monday, July 1, 2024

तमिळनाडू निवडणूक २०२१: मतदान करण्यासाठी पोहोचले साऊथ सुपरस्टार; कोणी कुटुंबासह, तर कोणी सायकलवरून लावली हजेरी

तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणुका सुरू आहेत. त्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानही सुरू झाले आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच तमिळ सुपरस्टार्स थाला अजित, रजनीकांत आणि सूर्यासारखे अनेक कलाकार आपली मते देण्यासाठी पोहोचले.

कलाकारांशी संबंधित फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. त्याचवेळी सुपरस्टार थाला अजितचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो त्याच्या पत्नीसोबत मतदान करण्यासाठी पोहोचताच, चाहत्यांनी त्याला घेरले. कोरोना व्हायरसच्या इतका प्रभाव असतानादेखील, थाला अजित फोटोग्राफर आणि चाहत्यांनी घेरलेला दिसला.

थाला अजितशी संबंधित हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामच्या फॅनपेजवर शेअर केला गेला आहे, ज्यामध्ये तो मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाताना दिसत आहे. या व्हिडिओ आणि फोटोवर चाहतेही बर्‍याच कमेंट्स करत आहेत. थाला अजित व्यतिरिक्त, रजनीकांतही मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचले. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते मतदान केंद्राच्या बाहेर दिसत आहे.

त्यांच्याशिवाय थालापथी विजय, कमल हासन, श्रुती हासन, सूर्या आणि कार्ती हेदेखील मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी उपस्थित होते. त्याचवेळी, अभिनेता विजयदेखील मत देण्यासाठी मतदान केंद्रावर सायकलवरून पोहोचला.

तमिळनाडूमध्ये एकूण 234 जागेसाठी विधानसभा निवडणुका होत आहेत. मुख्यमंत्री के पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ पनीरसेलवम, द्रविड मुनेत्र कड़गमचे अध्यक्ष एम के स्टालिन, अम्मा मक्कल मुनेत्र कषगमचे संस्थापक टीटीवी दिनाकरण आणि मक्कल निधि मय्यमचे प्रमुख कमल हासन यांच्यासह एकूण 3,998 उमेदवार विधानसभा निवडणुकीत आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. सत्ताधारी एआयएडीएमके (AIADMK) पक्ष स्वबळावर 191 जागांवर निवडणूक लढवत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘किंग’ खानची लाडकी लेक सुहाना आहे शंकराची मोठी भक्त, गळ्यातील पेंडेंट पाहून तुम्हीही म्हणाल ‘खरंच की!’

-‘बेबो’चे वडील रणधीर कपूर यांनी चुकून शेअर केला ‘सैफीना’च्या दुसऱ्या मुलाचा फोटो? फोटो होतोय जोरदार व्हायरल

-प्राणघातक अपघाताची आठवण काढत अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली ‘अजय- काजोल यांनी संपूर्ण इंडस्ट्रीपासून लपवली ही गोष्ट’

हे देखील वाचा