Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड काजोलच्या आईच्या प्रकृतीत सुधारणा, ‘या’ दिवशी मिळणार तनुजा यांना आयसीयूमधून डिस्चार्ज

काजोलच्या आईच्या प्रकृतीत सुधारणा, ‘या’ दिवशी मिळणार तनुजा यांना आयसीयूमधून डिस्चार्ज

काजोलची आई आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा सध्या रुग्णालयात दाखल आहेत. रविवारी तनुजा यांचीप्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे, जे ऐकल्यानंतर त्यांचे चाहते खूश होतील.

तनुजा यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, जवळच्या सूत्राने सांगितले की, तनुजा यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे आणि त्यांना 1-2 दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. तनुजाला वयाशी संबंधित समस्यांमुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

तनुजा यांच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर तनुजा यांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला होता. त्यांनी 1960 मध्ये रिलीज झालेल्या छबिली या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.

एक काळ असा होता की त्यांचे नाव इंडस्ट्रीत प्रसिद्ध होते. मोठमोठे दिग्दर्शक त्यांना त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्यास उत्सुक होते. ‘जीने की राह’, ‘गुस्ताखी माफ’, ‘पैसा या प्यार’ अशा अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली होती. तनुजाने हिंदी चित्रपटांशिवाय बंगाली चित्रपटांमध्येही आपले नाव कमावले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘महादेव का गोरखपूर’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, रवी किशनच्या लूकने वेधले लक्ष
जॅकलिनने ठोठावला दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा, मनी लाँड्रिंग प्रकरण रद्द करण्याची केली मागणी

हे देखील वाचा