Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड ‘जवळपास 10 वर्षे लागली पण…’, तापसी पन्नूने ‘डुंकी’च्या निमित्ताने शाहरुख खानसाठी लिहिली भावूक पोस्ट

‘जवळपास 10 वर्षे लागली पण…’, तापसी पन्नूने ‘डुंकी’च्या निमित्ताने शाहरुख खानसाठी लिहिली भावूक पोस्ट

अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा बॉलिवूड जगतातील सर्वात लोकप्रिय आणि आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने अनेक दशके हिंदी जगतावर अधिराज्य गाजवले आहे. शाहरुख खान चित्रपटात असला की चित्रपट हीट ठरणार अशीच व्याख्या तयार झाली आहे. त्यामुळे शाहरुख खानसोबत चित्रपटात काम करायची प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. नुकताच शाहरुख खानच्या डुंकी चित्रपटाची घोषणा झाली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) शाहरुख खानसोबत दिसणार आहे. याचा आनंद तापसीने एक भावूक पोस्ट करत व्यक्त केला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, राजकुमार हिरानी यांनी त्यांच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुखसोबत पहिल्यांदाच चित्रपटात काम करताना तापसी खूप खूश आहे. ज्याचा आनंद तिने खास पोस्ट करत व्यक्त केला आहे. ट्विटरवर आपला आनंद व्यक्त करताना तापसीने होय, इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता आणि जेव्हा तुम्ही स्वतः सर्वकाही करता तेव्हा ते अधिक कठीण होते.” असा संदेश दिला आहे.

याबद्दल पुढे बोलताना तापसीने शाहरुखच्याच ओम शांती ओम मधील डायलॉग लिहला आहे ज्यामध्ये ती म्हणते की, “एका सुपरस्टारने असेही म्हटले होते की, जर तुम्हाला खरंच काही हवे असेल, तर संपूर्ण विश्व तुम्हाला त्या गोष्टीकडे घेऊन जाते. प्रामाणिकपणा हे कठोर परिश्रम आणि संयमाचे फळ आहे. जवळपास 10 वर्षे लागली पण शेवटी संधी मिळालीच.” दरम्यान राजकुमार हिरानी यांचा डुंकी चित्रपट २३ डिसेंबर २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. तापसी पन्नूने याआधी हसीन दिलरुबा, रश्मी रॉकेट, थप्पड अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची नेहमीच चर्चा होत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा