Wednesday, July 3, 2024

शेवटच्या क्षणी निर्मात्यांनी ‘या’ चित्रपटातून केली होती तापसीची हाकालपट्टी; नंतर कारण न सांगताच मागितली माफी

तापसी पन्नू ही अशी बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी स्वत:च्या जोरावर चित्रपट हिट करण्यासाठी ओळखली जाते. तापसीकडे आता अनेक प्रोजेक्ट आहेत. पण ती सध्या तिचा आगामी ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटासाठी खूप उत्साहित आहे. या चित्रपटात ती विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणेसोबत दिसणार आहे. चित्रपटासोबतच ती प्रत्येक गोष्टींवर तिचे दिलखुलास मत मांडत असते, यामुळे ती अनेक वेळा चर्चेत असते. अशातच तापसीने एक धक्कादायक खुलासा केला आहे की, या चित्रपटात शूटिंगच्या शेवटच्या क्षणी तिला चित्रपटातून बाहेर काढले होते. यामागील कारण देखील तिला सांगितले नव्हते. तिने ‘आरजे’ला दिलेल्या एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता. (Tapasee pannu says makers apologize for drop her from film)

याबाबत बोलताना ती म्हणाली की, तिला सोशल मीडियावरून या गोष्टीची माहिती मिळाली की, तिला या चित्रपटातून बाहेर काढले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिची माफी मागितली, पण चित्रपटातून काढण्यामागचे कारण सांगण्यास नकार दिला.

तापसीने सांगितले की, “हे सगळे माझ्यासोबत घडले आहे. मी तयार होऊन गेले नव्हते. मी फक्त तारीख दिली होती त्यानंतर मला काढण्यात आले. परंतु याबाबत निर्माते माझ्यासोबत काहीच बोलत नव्हते. हे सगळे मला सोशल मीडियवरून समजले.”

तिने पुढे सांगितले की, “त्यांनी मला फोन केला आणि मला भेटले. हे सांगण्यासाठी नाही की, तू याबाबत मीडियामध्ये काय बोलत आहे आणि सगळे माझी माफी मागू लागले. ते माझी माफी मागण्यासाठी भेटले होते. पण तरीही ते खरं कारण सांगत नव्हते की, त्यांनी हे असं का केलं.”

तापसी पन्नूने 2019 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “त्यांना चित्रपटात रिप्लेस केले गेले आहे. परंतु त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये स्वावलंबी बनण्याचे ठरवले आहे. मी स्टार-कीडसाठी चित्रपट गमावले आहेत. ज्या चित्रपटबाबत मी बोलत होते, त्यांनी मला त्यातून बदलले आहे.”

तिचा ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट 2 जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तापसी पन्नू यासोबतच ‘लक्ष्मी रॉकेट’, ‘दोबारा’, ‘लूप लपेटा’ आणि ‘शाबास मिट्टी’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्का शर्माचा कौतुकास्पद निर्णय; ‘या’ कारणामुळे ऑनलाईन विकणार प्रेग्नंसीमधील कपडे

-अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या शिरपेचात मानाचा तुरा, राज्यपालांच्या हस्ते ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कारा’ने केले सन्मानित

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

हे देखील वाचा