‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ या कॉमेडी टीव्ही मालिकेत एकापेक्षा एक व्यक्तिरेखा दिसतात. छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून या कार्यक्रमाचे नाव घेतले जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसायला लावते. यामध्ये जेठालालच्या भूमिकेत दिलीप जोशीपासून(Dipil Joshi) ते बबिताजीच्या भूमिकेत मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि बापूजीच्या भूमिकेत असलेले अमित भट्ट यांचा समावेश आहे.
यामध्ये सर्वात लोकप्रिय भूमिका म्हणजे जेठालाल. जेठालालच्या भूमिकेमुळे घराघरात प्रसिद्ध झालेल्या दिलीप जोशींबद्दल सांगणार आहोत. दिलीप जोशी यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करण्यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र, त्यांच्या भूमिका इतक्या छोट्या होत्या की प्रेक्षकांचे फारसे लक्ष गेले नाही, चित्रपट जगतातील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले आहे. दिलीप जोशी यांनी कोणत्या चित्रपटात अभिनय केला ते पाहूया.
दिलीप जोशी सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ या प्रसिद्ध चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांनी ‘रामू’ नावाच्या नोकराची भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला पण त्याचा विशेष फायदा दिलीप जोशींना होऊ शकला नाही. दिलीप जोशी यांनी सलमानच्या आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपट ‘हम आपके है कौन’ मध्ये ‘भोला प्रसाद’ नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. ही भूमिका सुद्धा त्यांना प्रसिद्धी देऊ शकली नाही. त्याचबरोबर दिलीप जोशी यांनीही अभिनेता शाहरुख खानच्या चित्रपटात काम केले आहे. जुही चावला आणि शाहरुख खानच्या ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ या चित्रपटात दिलीप जोशी यांनी ‘सपने’ नावाच्या गुंडाची भूमिका केली होती.
इतकंच नव्हेतर दिलीप जोशी अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या चित्रपटातही दिसले आहेत. अक्षय कुमारच्या ‘खिलाडी 420’ या चित्रपटात दिसला होता, तर प्रियांका चोप्रा स्टारर चित्रपट ‘व्हॉट्स युअर राशी’मध्ये दिलीपने हरमन बावेजाच्या मोठ्या भावाची भूमिकाही साकारली होती. मात्र, दिलीप जोशी यांना खरी ओळख ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही मालिकेतूनच मिळाली. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यामुळेच ते या मालिकेत सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- वयाच्या ६३ व्या वर्षी नीतू कपूरने ‘डान्स मेरी राणी’ गाण्यावर केला नोरा फतेहीसोबत जबरदस्त डान्स, एकदा पाहाच
- जेव्हा कृष्णा अभिषेकच्या जन्मासाठी गोविंदाने केला होता नवस, जाणून घ्या ‘तो’ रंजक किस्सा
- कधीकाळी नीलमच्या प्रेमात वेडा होता गोविंदा, लग्न करायचं होतं पण ‘या’ कारणामुळे अपूर्णच राहिले प्रेम