Friday, February 3, 2023

TMKOC | मुनमुन दत्ताच्या ठुमक्यांनी घातला धुमाकूळ, ‘बबीता जी’च्या अदांवर भुरळले चाहते

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या मालिकेतील प्रत्येक चेहरा प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. यामध्ये मालिकेतील बबिताच्या भूमिकेत असलेली मुनमुन दत्ता (Munmun Dutta) घराघरात प्रसिद्ध आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने मुनमुनने मनोरंजन जगतात भरभरून प्रसिद्धी मिळवली आहे. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन ती नेहमीच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. सध्या मुनमुनचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या अभिनेत्री मुनमुन दत्ताचा एक व्हायरल व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्या धमाकेदार डान्सचा तडका पाहायला मिळत आहे. तिच्या या दिलखेचक अदा आणि डान्स पाहून चाहते फिदा झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये मुनमुन हिरव्या रंगाच्या स्पार्कली ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या ड्रेसवर तिने मोकळे केस सोडले आहेत जे तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत. या व्हिडिओमधील व्हायरल डान्स सध्या सगळीकडे चर्चेत असलेल्या तमन्ना भाटिया आणि बादशहाच्या गाण्यावरील आहे. या गाण्यात ती घरातील प्रत्येक कोपऱ्यात जाऊन डान्स करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत मुनमुनने “हे गाणे आणि हा ड्रेस घालून मला खूप आनंद झाला आहे. या गाण्यावर डान्स करायला खूप आनंद होत आहे.” अशा शब्दात आपला आनंद व्यक्त केला आहे. सोबतच तिने तमन्ना आणि बादशहाचेही कौतुक केले आहे. याआधीही मुनमुन दत्ताचा असाच एक डान्स व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. ज्यावर तिच्या चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

 

हे देखील वाचा