Saturday, April 19, 2025
Home अन्य भारतीय संघाच्या विजयानंतर तारक मेहताच्या निर्मात्यांला पडला ‘हा’ प्रश्न!! नेटकऱ्यांनी केले ट्रोल

भारतीय संघाच्या विजयानंतर तारक मेहताच्या निर्मात्यांला पडला ‘हा’ प्रश्न!! नेटकऱ्यांनी केले ट्रोल

भारताच्या आशिया चषक स्पर्धेतील विजयानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचे कौतुक करताना दिसत आहे. या विजयासह भारताने गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला. भारताला शेवटच्या तीन चेंडूत ६ धावांची आवश्यकता असताना हार्दिक पंड्याने षटकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अभिनेता रितेश देशमुख(Ritiesh Deshmukh),कार्तिक आर्यन यांसह अर्जुन रामपाल या तिघांनीही भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक केले आहे.

भारताच्या विजयाचा आनंद सोशल मीडियावर दिसून येत होता. सेलिब्रिटींकडून फोटो, व्हिडिओ शेअर करत भारतीय टीमचं कौतुक करण्यात येतं होतं. असं असताना तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते यांनी असं ट्वीट केलं की, नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. काल रात्री सामना संपल्यानंतर असितकुमार मोदी(Asit Kumar Modi)यांनी रात्री १२ वाजता एक ट्विट केले की, ‘बहुतांश पाकिस्तानी क्रिकेटपटू त्यांच्या राष्ट्रीय भाषेत हिंदी किंवा उर्दू यामध्ये बोलतात आणि आमचे क्रिकेटर इंग्रजीत बोलतात, तुमचे मत काय आहे? भारताच्या विजयावर असित मोदींनी असा प्रश विचारल्याने त्यांना ट्रोल करण्यात आले.

नेटकऱ्यांनी असित मोदींना ट्रोल करताना स्वत:च्या मालिकेवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.एकानं लिहिलं की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या पुढच्या भागात हा विषय घ्या आणि मग वाट्टेल तितका चघळत बसा. एकाने लिहले की ‘त्यांना इंग्रजी येत नसल्याने ते इंग्रजीत बोलत नाहीत’. निर्मात्याला ट्रोल करत युजरने लिहिले, ‘आधी तुमचा शो हाताळा आणि मग इतरांशी बोला. तर दुसऱ्या एका युझरनं थेट मालिकेत दया भाभीची एन्ट्री केव्हा होणार असा प्रश्न थेट निर्मात्यांना विचारला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, पोस्ट शेअर करत दिली माहिती
शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन! व्हिलचेअरवर असूनही अभिनेत्रीने केले असे जल्लोशात स्वागत
बिग ब्रेकिंग l जेष्ठ बंगाली अभिनेत्याचे दुःखद निधन, वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा