Wednesday, July 3, 2024

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील भिडे अर्थात मंदार चांदवडकर एका भागासाठी घेतात तब्बल ‘इतकी’ रक्कम

आजच्या घडीला मालिकाविश्वात रेकॉर्डब्रेक यश मिळवणारी मालिका कोणती असं प्रश्न कोणी विचारला तर सर्वांचे एकच उत्तर असेल, आणि ते म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या घरातीलच झाले आहे. हे कलाकार तुमचे मनोरंजन करण्यासाठी बक्कळ पैसा घेतात. आज आपण याच मालिकेतील महत्वाचे पात्र साकारणाऱ्या एका कलाकाराच्या मानधनाबद्दल जाणून घेणार आहोत. जेठालाल, दयाबेन, मेहता साहेब आदी सर्वच कलाकारांमध्ये अजून एक कलाकार असे आहेत ज्यांना या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवून दिली. आणि ते कलाकार आहे. एकमेव सेक्रेटरी श्री आत्माराम तुकाराम भिडे अर्थात अभिनेते मंदार चांदवडकर.

मंदार यांनी भिडे ही भूमिका साकारली आणि संपूर्ण जगात याच नावाने ओळख मिळवली. आज मंदार यांना कोणीही त्यांच्या खऱ्या नावाने ओळख नाही त्यांना भिडे म्हणूनच हाक मारतात. या भूमिकेने मुळे अमाप लोकप्रियता मिळवणारे मंदार चांदवडकर हे एका भागासाठी तब्बल ८० हजार रुपये घेतात. मंदार चांदवडकर यांची भूमिका जेठालाल इतकीच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. मंदार हे अभिनयात येण्याआधी दुबईमध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करायचे. तिथे देखील ते एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते.

अभिनयासाठी ते मुंबईत आले आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने त्यांना उत्तम ब्रेक मिळवून दिला. आज १४ वर्ष झाले मंदार चांदवडकर हे ‘भिडे’ ही भूमिका साकारत आहे. त्यांच्या शेजारी राहणारे, इलेक्ट्रीसिटीचे बिल देणारा व्यक्ती सर्वच लोकं त्यांना भिडे म्हणूनच ओळखतात. दरम्यान मंदार चांदवडकर यांची एकूण संपत्ती ४२ कोटींची असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिलजीत दोसांझ आहे दहावी पास, कंगना रणौतसोबत झालेल्या वादामुळे आला होता चर्चेत
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून वाद काही थांबेना, आता थेट महिला आयाेगाकडून चित्रा वाघ यांना नाेटीस

 

हे देखील वाचा