वाढदिवशीच झाला होता अभिनेत्री तरुणी सचदेवचा विमान अपघातात मृत्यू, सर्वात महाग अभिनेत्री म्हणून होती ओळख


आपल्या देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत ८ डिसेंबर २०२१ रोजी या जगाचा निरोप घेतला. पूर्व सेनाध्यक्षसोबत त्याची पत्नी मधुलिका आणि इतर १४ एअरफोर्स अधिकारी शहीद झाले आहेत. तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये वायुसेनेचे केएम १७ हेलिकॉप्टर क्रश झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर सगळ्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु लोकांचा प्राण वाचला नाही. देशभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. याआधी देखील अनेक प्रसिद्ध लोकांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. अभिनेत्री तरुणी सचदेव हिचा देखील विमान अपघातात मृत्यू झाला आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत अधिक माहिती.

तरुणी सचदेव हिला अनेकजण ‘रसना गर्ल’ या नावाने ओळखतात. ती बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरसारखी दिसत होती. तिने ५० पेक्षाही जास्त कमर्शिअल जाहिरातींमध्ये काम केले होते. अगदी कमी वयात तिने तिची ओळख निर्माण केली. तिने केवळ १४व्या वर्षीच तिची लोकप्रियता मिळवली आहे. तरुणीने जे यश मिळवले होते तिथंपर्यंत पोहचायला लोकांना खूप मेहनत घ्यावी लागते.

taruni sachdeva
Photo Courtesy : YouTube/Screengrab/Cine Samugam

तरुणीचा जन्म १४ मे १९९८ साली झाला होता. १४ मे २०१२ साली विमान अपघातात तिचा मृत्यू झाला. केवळ १४ वर्षाच्या आयुष्यात तिने तिची खास ओळख निर्माण केली. हा अपघात नेपाळमधील जोमसोम विमानतळावर झाला होता. तिच्या मृत्यूने सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला होता. तिच्या १४ व्या वाढदिवशी तिने अंतिम श्वास घेतला होता.

तिने २००४ साली मल्याळम वेल्लीन क्षेत्रम या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने प्रियामणीसोबत ‘सत्यम’ या चित्रपटात काम केले. तिने वयाच्या केवळ पाचव्या वर्षी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. तिने ‘सपना’, ‘कोलगेट’, ‘आयसीआयसीआय बँक’, ‘रिलायन्स मोबाईल’, ‘ गोल्ड विनर’, ‘शक्ती मसाला’ यांसारख्या जाहिरातींमध्ये काम करून नाव कमावले आहे. त्याकाळी ती सर्वात महाग बालकलाकार होती.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!