Monday, July 1, 2024

बाप रे! ‘टारझन’ फेम हेमंत बिर्जेचा अपघात, मुलगी अन् पत्नीलाही दुखापत

आजही जेव्हा बॉलिवूडमधील टारझनबद्दल बोलले जाते, तेव्हा अभिनेता हेमंत बिर्जेचा (Hemant Birje) चेहरा चाहत्यांच्या मनात येतो. त्यांच्याबद्दल फार कोणालाच माहिती नाही. पण या दरम्यान आता बातमी आली आहे की, मंगळवारी (११ जानेवारी) रात्री त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि पत्नीही उपस्थित होत्या.

हेमंत आणि त्यांच्या पत्नीला दुखापत
माध्यमातील वृत्तानुसार, ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर होते, तिथे त्यांची कार दुभाजकाला धडकली. रात्री आठच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. उर्से टोल प्लासाजवळ हा अपघात झाला. या अपघातात अभिनेता हेमंत आणि त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे, तर त्यांची मुलगी पूर्णपणे सुरक्षित असून तिला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (tarzan actor hemant birje met road accident his wife and daughter was with him)

त्वरित दिले गेले उपचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत आणि त्यांच्या पत्नीला तातडीने पवना येथील जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. जिथे दोघांनाही व्यवस्थित उपचार देण्यात आले आणि आता हेमंत आणि त्याचे कुटुंबीय पूर्णपणे बरे आहेत.

पहिलाच चित्रपट ठरला सुपरहिट
हेमंत बिर्जे यांनी १९८५ मध्ये रिलीझ झालेल्या ‘अ‍ॅडव्हेंचर ऑफ टारझन’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पहिल्याच चित्रपटापासून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. हिंदीशिवाय त्यांनी साऊथ इंडस्ट्रीतही भरपूर काम केले. पण नंतर त्यांना पहिल्या चित्रपटासारखे यश मिळू शकले नाही.

चित्रपटापासून दूर आहेत हेमंत
हेमंत शेवटचा सलमान खानच्या ‘गर्व’ चित्रपटात दिसले होते. या चित्रपटातही ते काही खास कमाल करू शकले नाही. हेमंत गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट जगतापासून दूर आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा