[rank_math_breadcrumb]

ही भारतीय वेब सिरीज नेटफ्लिक्सवर वर्चस्व गाजवत, ५ कोटी व्ह्यूज ओलांडून पहिल्या क्रमांकावर करतीय ट्रेंड

इमरान हाश्मी हा लोकप्रिय अभिनेता असून, त्याचा अभिनय अजूनही चाहतांना भावतो. तर त्याची अलीकडील वेब सिरीज “तस्करी: द स्मगलर्स वेब” जी सध्या केवळ भारतातच नाही तर जगभरात ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

स्ट्रीमिंगच्या पहिल्या आठवड्यातच, ही मालिका जागतिक टॉप १० नॉन-इंग्रजी मालिकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होती आणि असे करणारी ती पहिली भारतीय मालिका बनून इतिहास रचला. सुरुवातीला, ही मालिका २० वेगवेगळ्या देशांमध्ये नेटफ्लिक्सच्या नॉन-इंग्रजी शोच्या यादीत ट्रेंड करत होती आणि अजूनही भारतासह नऊ देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. “तस्करी: द स्मगलर्स वेब” आता केवळ भारतातच नाही तर जगभरात धुमाकूळ घालत आहे. तर १४ जानेवारी २०२६ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती.

नीरज पांडे दिग्दर्शित या मालिकेत इमरान हाश्मी (Emraan Hashmi)मुख्य भूमिकेत आहे, त्याच्यासोबत शरद केळकर, अनुराग सिन्हा, झोया अफरोज, अमृता खानविलकर, फ्रेडी दारूवाला, अनुजा साठे आणि नंदीश संधू सारखे कलाकार आहेत.

या मालिकेला IMDb वर 7.2 रेटिंग मिळाले आहे. तर दिग्दर्शक नीरज पांडे सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे.ही कथा, एक सस्पेन्सफुल क्राइम थ्रिलर, मुंबई विमानतळ कस्टम विभागाभोवती फिरते, जिथे इमरान हाश्मी एका अधिकाऱ्याची भूमिका करतो. मुंबई विमानतळ कस्टम विभाग एका आंतरराष्ट्रीय सिंडिकेटला उद्ध्वस्त करण्यात गुंतलेला आहे. इमरान हाश्मी अर्जुन मीनाची भूमिका करतो, जो एक प्रामाणिक कस्टम अधिकारी आहे

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

माझ्या पोस्टमुळे गैरसमज झाला होता…, विक्रांत मेस्सीने निवृत्तीच्या पोस्टवर सोडले मौन