Tuesday, November 11, 2025
Home बॉलीवूड इमरान हाश्मी आणि यामी गौतम यांचा ‘हक’ चित्रपट कायदेशीर अडचणीत; शाह बानोच्या मुलीने चित्रपटाला पाठवली कायदेशीर नोटीस

इमरान हाश्मी आणि यामी गौतम यांचा ‘हक’ चित्रपट कायदेशीर अडचणीत; शाह बानोच्या मुलीने चित्रपटाला पाठवली कायदेशीर नोटीस

इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आणि यामी गौतम यांचा आगामी चित्रपट “हक” प्रदर्शित होण्यापूर्वीच कायदेशीर अडचणीत सापडला आहे. शाह बानोची मुलगी सिद्दिका बेगम हिने निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे, ज्यामध्ये चित्रपटाचे प्रमोशन आणि रिलीज तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. हा चित्रपट शाह बानो प्रकरणावर आधारित आहे.

नोटीसनुसार, सिद्दिका बेगमचा आरोप आहे की दिवंगत शाह बानो बेगम यांचे वैयक्तिक जीवन त्यांच्या कायदेशीर वारसांच्या परवानगीशिवाय दाखवले जात आहे. ही कायदेशीर नोटीस दिग्दर्शक सुपरन वर्मा, निर्माते जंगली पिक्चर्स आणि बावेजा स्टुडिओज तसेच सीबीएफसी यांना पाठवण्यात आली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार “हक” हा चित्रपट १९८५ च्या सर्वोच्च न्यायालयातील मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाह बानो बेगम या खटल्यावर आधारित आहे. हा खटला महिला हक्क आणि पोटगी कायद्यांशी संबंधित आहे. मुस्लिम महिलांच्या हक्कांच्या संरक्षणाच्या लढाईत हा एक मैलाचा दगड मानला जातो.

सुपर्ण एस. वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात इमरान हाश्मी आणि यामी गौतम यांच्यासह वर्तिका सिंग, दानिश हुसैन, शीबा चड्ढा आणि असीम हट्टंगडी यांच्या भूमिका आहेत. जंगली पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाची निर्मिती विनीत जैन, विशाल गुरनानी, जुही पारेख मेहता आणि हरमन बावेजा यांनी केली आहे. हा चित्रपट 7 नोव्हेंबर 2025 रोजी रिलीज होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

‘रा.वन’च्या सिक्वेलबद्दल शाहरुख खानने दिला मोठा इशारा, जाणून घ्या किंग खानचा हा चित्रपट कधी बनणार?

हे देखील वाचा