Friday, August 8, 2025
Home अन्य दु:खद! प्रसिद्ध ड्रमर टेलर हॉकिन्सचा धक्कादायक मृत्यू, जगभरात व्यक्त केली जातेय हळहळ

दु:खद! प्रसिद्ध ड्रमर टेलर हॉकिन्सचा धक्कादायक मृत्यू, जगभरात व्यक्त केली जातेय हळहळ

रॉक बँन्ड फू हॉकिन्स या म्युझिक कंपनीसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या टीममधील प्रसिद्ध ड्रमर टेलर हॉकिन्सचा (Taylor Hawkins) धक्कादायक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. फक्त वयाच्या ५०व्या वर्षी एका प्रतिभावान वादकाच्या मृत्यूने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या बातमीने टेलरच्या देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या या बातमीने संगीत क्षेत्रात दुःख व्यक्त केले जात आहे. 

रॉक बँन्ड फू हॉकिन्सच्या सुरूवातीच्या काळापासून सदस्य असलेल्या प्रसिद्ध ड्रमर टेलर हॉकिन्सचा दुर्देवी मृत्यू झाल्याची बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सध्या हॉकिन्स या टीमसोबत दक्षिण आफ्रिकेत काम करत होता. तो पुढे अर्जेंटिनामध्येही त्याचा शो करणार होता. मात्र त्याआधीच हॉकिन्सच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. या बातमीने त्याच्या मित्रांसोबत प्रसिद्ध गायक आणि संगीत निर्माता विशाल दादलानीनेही शोक व्यक्त केला आहे. यावेळी आपल्या प्रिय सदस्याच्या मृत्यूबद्दल सांगताना रॉक बँन्ड फू हॉकिन्सकडून “आमचा लाडका टेलर हॉकिन्सच्या मृत्यूने आमच्या टीमवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संगीताबद्दलची त्याची आवड आमच्या कायम स्मरणात राहील. आम्हाला त्याच्या बायकोची,मुलांची आणि कुटूंबाची काळजी लागली आहे. यावेळी आम्ही त्यांच्यासोबत आहोत” असा भावूक संदेश दिला आहे.

रॉक बँन्ड फू हॉकिन्सचे निर्माते दवे ग्रोहल यांच्यानंतर हॉकिन्स या टीमचा प्रमुख सदस्य होता. २८ वर्षापुर्वी तयार झालेल्या या टीममध्ये टेलर २५ वर्षापासून आपले योगदान देत होता. त्याच्या मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याला श्रध्दांजलीपर अनेक संदेश व्हायरल होत आहेत.

टेलर हॉकिन्सचा जन्म १९७२ मध्ये झाला होता. त्याच्या पश्चात बायको आणि तीन मुले असा परिवार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा