जॉन अब्राहमने शेअर केली बालपणीची कहाणी, …म्हणून जिप्सी कारसोबत जोडलीये त्याची भावनीक बाजू

हिंदी चित्रपट जगताचा रॉबिन हूड अशी जॉन अब्राहमची(John Abraham) खास ओळख आहे. जॉन अब्राहमने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. चित्रपटातील अभिनयासाठी तर जॉन अब्राहम प्रसिद्ध आहेच पण जॉनचे बाईकवेडही जगजाहीर आहे. जॉनच्या ताफ्यात अशा आलीशान कार आणि बाईक्स आहेत ज्यांची किंमत कोटींमध्ये आहे. मात्र आज महागड्या कार आणि बाईक्स घेणाऱ्या जॉनची आधी परिस्थिती अशी होती की त्याच्या वडिलांना साधी जिप्सी घेण्यासाठीही संघर्ष करावा लागला होता. काय आहे हा किस्सा चला जाणून घेऊ.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेता जॉन अब्राहमने एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, मी सगळ्यात आधी आधी एक जिप्सी खरेदी केल्याची माहिती दिली होती. ही गाडी खरेदी करण्यामागे एक भावूक कारण असल्याचेही त्याने सांगितले होते. याबद्दलची आठवण सांगताना म्हणाला की, “मी लहान असताना माझ्या वडिलांना त्यांच्या मित्राने व्यवसायात फसवणूक केली होती. त्यावेळी वडिलांनी एक जिप्सी बूक केली होती, मात्र या फसवणूकीमुळे ही गाडी त्यांना घेता आली नाही. म्हणून मी त्यावेळीच ठरवले होते की, मी एक जिप्सी खरेदी करेन. म्हणून ही गाडी माझ्यासाठी खास आहे.” अशी प्रामणिक कबूलीही जॉनने यावेळी दिली होती. याबद्दल पुढे बोलताना तो म्हणाला की, “ही गाडी मी आर्मीच्या कोट्यातून खरेदी केली होती. यामुळेही मला ही गाडी जास्त आवडते.”

View this post on Instagram

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

दरम्यान जॉन अब्राहमकडे महागड्या गाड्यांचा मोठा ताफा आहे. यामध्ये लँबोर्गिनी, ऑडी क्यु ७, सारख्या गाड्यांचा ताफा आहे. तर बाइक्समध्ये यामाहा आर१५,  सुझुकी हयाबुसा सारख्या महागड्या गाड्या आहेत. जॉनच्या दमदार बॉडीचीही चित्रपट जगतात नेहमीच चर्चा रंगलेली असते. जॉन लवकरच अभिनेते प्रकाश राज यांच्यासोबत अटॅक चित्रपटात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post