Thursday, March 5, 2026
Home बॉलीवूड Video: नवोदित अभिनेत्रीच्या ‘बेली डान्स’ व्हिडिओवर भारतीय खेळाडू घायाळ

Video: नवोदित अभिनेत्रीच्या ‘बेली डान्स’ व्हिडिओवर भारतीय खेळाडू घायाळ

बॉलीवूड आणि क्रिकेट यांचं खूप जुणं नातं आहे. अनेक खेळाडू आणि अभिनेत्रींच्या अफेअर्सच्या चर्चा सुरू असल्याचे वृत्त समोर येत असते. अशामध्येच आता नवोदित अभिनेत्री प्राची सिंगच्या पोस्टला भारतीय क्रिकेटपटूने लाईक केल्यामुळे ती चर्चेचा विषय ठरत आहे.

प्राचीने आज (२३ नोव्हेंबर) सकाळी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या स्वतःच्या ‘बेली डान्स’ व्हिडिओला भारतीय सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने काही मिनिटातच लाईक केल्याचे समोर आले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ अभिनेत्री प्राची सिंगला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. सोशल मीडियावरून त्याने केलेल्या काही कमेंट्समुळे असा अंदाज वर्तविला गेला होता. प्राची आणि पृथ्वी दोघेही एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट्स करताना दिसून येतात.

नवोदित अभिनेत्री आहे प्राची सिंग

प्राची सिंग ही नवोदित अभिनेत्री आहे. ती एका प्रसिद्ध मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसली होती. प्राची मॉडेलिंग आणि एक उत्तम बेली डान्सर म्हणून ओळखली जाते. सध्या ती पृथ्वी शॉची कथित प्रेयसी म्हणून चर्चेत आहे.

पृथ्वी शॉची कामगिरी

शॉने भारतीय संघाकडून ४ कसोटी सामने आणि ३ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ५५.८३ च्या सरासरीने ३३५ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतक आणि २ अर्धशतकेही ठोकली आहेत. याव्यतिरिक्त वनडे क्रिकेटमध्ये त्याने २८ च्या सरासरीने ८४ धावा केल्या आहेत.

हे देखील वाचा