बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut)सध्या तिच्या ‘तेजस’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘तेजस’ पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत संघर्ष करत आहे.चित्रपटाची बिकट परिस्थिती असतानाही कंगना ‘तेजस’ हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहे. आता नुकताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कंगनाचा सर्वेश मेवाडा दिग्दर्शित ‘तेजस’ हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी, ३१ ऑक्टोबर रोजी कंगनाच्या ‘तेजस’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित राहणार आहेत. लोक भवन सभागृह, लखनौ येथे विशेष स्क्रीनिंग होणार आहे. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये अभिनेत्री कंगना रणौतही उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या कार्यालयाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या लोक भवन, लखनौ येथे मंत्रिमंडळाच्या सन्माननीय सदस्यांसह विशेष स्क्रीनिंगमध्ये ‘तेजस’ चित्रपट पाहतील, असे ट्विटद्वारे सांगण्यात आले.’
अलीकडेच, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, कंगनाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अनेक भारतीय वायुसेना अधिकार्यांसाठी दिल्लीतील इंडियन एअर फोर्स ऑडिटोरियममध्ये चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते. यापूर्वी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमी कमाई पाहून कंगनाने एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना थिएटरमध्ये जाऊन ‘तेजस’ पाहण्याचे आवाहन केले होते.
कंगना म्हणाली होती की, “आमचा ‘तेजस’ चित्रपट थिएटरमध्ये आला आहे, ज्याने हा चित्रपट पाहिला त्याने आमचे कौतुक केले आणि आशीर्वाद दिला, परंतु कोविड नंतर आमचा हिंदी चित्रपट उद्योग पूर्णपणे सावरला नाही. ९९ टक्के चित्रपटांना प्रेक्षक संधी देत नाहीत. माझी मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की जर तुम्ही ‘उरी’, ‘निरजा’, ‘मेरी कॉम’ सारखे चित्रपट एन्जॉय केले असतील तर तुम्हाला ‘तेजस’ देखील खूप आवडेल.”
चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, ‘तेजस’ हा सर्वेश मेवाडा लिखित आणि दिग्दर्शित आहे आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित आहे. कंगना व्यतिरिक्त यात अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशिष विद्यार्थी, विशाक नायर, कश्यप शांगारी, सुनीत टंडन, रिओ कपाडिया, मोहन आगाशे आणि मुश्ताक काक यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात कंगना वायुसेना अधिकारी तेजस गिलची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 28 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
संघर्षाच्या दिवसांत स्टेशनवरच झोपायचे अनुपम खेर; म्हणाले; आजोबांच्या शिकवणीने बदलले जीवन’
मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणारा ‘झिम्मा२’ चा धमाकेदार टिझर रिलीझ, दिवाळीनंतर येणार प्रेक्षकांच्या भेटीला