Tuesday, August 5, 2025
Home टेलिव्हिजन बापरे! करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, केली ‘ही’ विनंती

बापरे! करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, केली ‘ही’ विनंती

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक समजले जाणारे करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) अनेकदा चर्चेत राहतात. ते टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत जे सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात.  बिग बॉसच्या १५व्या सीझनमध्ये जवळ आलेले करण आणि तेजस्वी हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. सध्या तेजस्वी आणि करणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचे खासगी क्षण टिपले आहेत. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या प्रेमप्रकरणाची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळते. सोशल मीडियावर सक्रिय असलेले तेजस्वी आणि करण कुंद्रा एका पार्टीत पोहोचले होते, जिथे दोघांनीही जोरदार पोज दिली. मात्र याचदरम्यान करण आणि तेजस्वीचा एक इंटिमेट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये करण आणि तेजस्वी एकमेकांना किस करताना दिसत आहेत.तेजस्वीला व्हिडीओ रेकॉर्ड होत आहे हे माहीत नव्हते, पण तिला कळताच ती कृपया पोस्ट करू नका म्हणत विनवणी करत असल्याचेही दिसत आहे. तेजस्वीला हा व्हिडिओ सोशल मीडियावर यायला नको होते, तर करणला याबाबत कोणतीही अडचण नव्हती.

करण आणि तेजस्वीचा हा व्हिडिओ एका बर्थडे पार्टीचा आहे, ज्यामध्ये मौनी रॉय देखील दिसत आहे. त्यांच्यासोबत इतरही अनेक स्टार्स पार्टीत उपस्थित होते. त्याच्या या व्हिडिओवर यूजर्स भरपूर कमेंट करत आहेत. काहीजण त्यांचे हे खाजगी क्षण शो ऑफ म्हणून सांगत आहेत, तर काहीजण ‘स्टोरी कोणीतरी पोस्ट केली आहे, आता ती हटवल्याने काही होणार नाही’ असे म्हणत आहेत. करण आणि तेजस्वीचा इंटिमेट व्हिडिओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांचे असे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल एकता कपूरच्या प्रसिद्ध फ्रेंचाइजी ‘नागिन’च्या सहाव्या सीझनमध्ये तेजस्वी प्रकाश मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसत आहे. यासोबतच, अलीकडेच अशी बातमी आली होती की, तेजस्वी प्रकाश बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा नवीन चित्रपट ‘ड्रीम गर्ल 2’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते.

हे देखील वाचा