‘लाज कशी वाटत नाही?’ वर्कआऊट व्हिडिओला भगवान शंकरांचे गाणे लावल्याने ईशा गुप्तावर संतापले नेटकरी

बॉलिवूड सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. यामध्ये अभिनेत्री ईशा गुप्ताचे (Esha Gupta) नाव पहिल्यांदा घेतले जाते. ईशा गुप्ता तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओंनी सोशल मीडियावर नेहमीच नेटकऱ्यांना मोहित करत असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या तिचा एक वर्कआऊट व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमीच तिच्या बोल्ड आणि सेक्सी व्हिडिओ आणि फोटोंमुळे चर्चेत असते. ईशा इंडस्ट्रीतील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे यात शंका नाही. ती तिच्या फिटनेसचीही खूप काळजी घेते, यासाठी ती नियमितपणे वर्कआउट करते, जी चाहत्यांनाही खूप आवडते. पण अलीकडेच जेव्हा ईशाने तिचा वर्कआउट व्हिडिओ शेअर केला तेव्हा चाहते तिच्यावर चांगलेच संतापलेले दिसले.

ईशाचे चाहते तिच्या वर्कआउट व्हिडिओवर नाही तर व्हिडिओ शेअर करताना वापरलेल्या गाण्यावर आक्षेप घेत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये इशा जीममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये आणखी एक व्यक्ती व्यायाम करताना दिसत आहे. परंतु या व्हिडिओला ईशाने शिवशंकरांचे गाणे लावले आहे, या गाण्यामुळेच ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

 

एका नेटकऱ्याने ईशाच्या या व्हिडिओवर संताप व्यक्त करताना “तुम्ही हे गाणे का वापरता, देवाची गाणी अशा व्हिडिओंसाठी नाहीत. म्हणून देवाचा आदर करा,” अशा शब्दात तिला खडेबोल सुणावले आहेत. तर आणखी एका नेटकऱ्याने तिला “हेच गाणे सापडले का? अशा व्हिडिओंना शिवजींची गाणी लावताना लाज वाटत नाही का,” असे म्हणत ईशाला चांगलेच फैलावर घेतले आहे.  अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर,अलीकडेच बॉबी देओलच्या ‘आश्रम’ या बहुचर्चित मालिकेच्या तिसऱ्या सीझन ‘आश्रम 3’ मध्ये ईशा दिसली होती. या सिरीजमध्ये तिची खूप बोल्ड भूमिका होती. त्याचबरोबर हेरा फेरीच्या तिसऱ्या भागात ही ती दिसणार आहे.

हेही वाचा –

हाय गर्मी! मलायका अरोराच्या बोल्ड फोटोंनी वाढवले सोशल मीडियाचे तापमान

धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपानंतर चित्रपटाचे नाव बदलले, भुलभूलैय्या नंतर ‘या’ चित्रपटात कार्तिक- कियारा करणार रोमान्स

‘तो सीन काढून टाका अन्यथा..’ ‘टाईमपास ३’ चित्रपटावर महाराष्ट्र एकीकरण समितीने व्यक्त केला संताप

 

Latest Post