Monday, June 9, 2025
Home टेलिव्हिजन तेजस्वी प्रकश आणि करण कुंद्रा देवीच्या आराधनेत मग्न, पहा व्हायरल व्हिडिओ

तेजस्वी प्रकश आणि करण कुंद्रा देवीच्या आराधनेत मग्न, पहा व्हायरल व्हिडिओ

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश बिग बॉसपासून प्रसिद्धा झोतात आली आहे. त्याशिवाय तिचा टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम नागिन सध्या चांगलाच चर्चेत आहे. तेजस्वीनी जेवढी आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते तेवढीच आपल्या वैयक्तीक आयुष्यासाठी देखिल चर्चेत असते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिला ट्रॉफीच नाही तर एक चांगला लाइफ पार्टनरही लाभला आहे. चाहत्यांच्या आवडीचं हे कपल सतत प्रेक्षकांच लक्ष वेधत असतं. आता पुन्हा एकदा या जोडीचे फोटो सोशल मीडियालवर तुफान व्हायरल होत आहेत.

नगिन 6 फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) ही मुख्य भुमिकेत काम करत आहे त्याशिवाय यामध्ये अनेक कलाकार महत्वाच्या भूमिका करत आहे. त्यामधील तेजस्वीची सासू म्हणजेच सुधा चंद्रन (Sudha Chandran) हिने आपल्या घरी माता की चौखी कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तेजस्वी देखिल तिचा बॉयफ्रेंड करण कुद्रा (Kran Kundra) सोबत माता की, चौकीमध्ये दर्शन घेण्यासाठी सामील झाली होती. ज्याचे फोटो सोशल मीडियवर तुफान व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये तेजस्वी आणि करण कुंद्राने देवीची चुनर कपाळी बांधली असून जेतस्वीनेन जोक्यावर चुनरी घेतली आहे. या दोघांची एकत्र जोडी खूपच दिसत होती. त्यावेळी तेजस्वीने ग्रे रंगाचा ट्रेडिशनल ड्रेस परिधान केला होता आणि करणने काळ्या रंगाची पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. दोघेही माता की, चौखी मग्न होताना दिसून येत आहेत. त्यांच्याशिवाय कार्क्रमामध्ये अदा खान (Ada Khan) देखिल दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

फोटोंशिवाय अभिनेत्रीचा व्हिडिओ देखिल आहेत. ज्यामध्ये दोघेही देवीच्या भक्तीमध्ये मग्न होताना दिसून येत आहे. त्यांच्या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर यांच्या फोटोंनी धुमाकुळ घातला आहे. तेजस्वी आणि करणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तेजस्वीचा ‘नागिन’ मालिका चांगली चलत असून करणनची ‘घायल’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू’, उर्फी पुन्हा चित्रा वाघ यांच्याशी नडली
बॉलिवूडच्या जुनियर बच्चनला देखील ‘वेड’ची भुरळ, रितेश-जिनिलियाची केली भरभरून स्तुती

हे देखील वाचा