Monday, June 9, 2025
Home मराठी ‘मी लिस्पटिकचे समर्थन करत नाही’, म्हणत अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पुसली ओठांवरील लिपस्टिक, व्हिडिओ व्हायरल

‘मी लिस्पटिकचे समर्थन करत नाही’, म्हणत अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पुसली ओठांवरील लिपस्टिक, व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असो किंवा बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्यासाठी त्यांचा मेकअप खूप महत्वाचा असतो. कुठल्याही प्रसंगी जायचे असल्यास त्यांच्या ड्रेससोबत त्यांच्या मेकअपला देखील तेवढेच महत्त्व असते. अशातच अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिची स्टाईल सगळ्यांना खूप आवडते. परंतु आता तिने असा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे सगळेच संभ्रमात आहेत.

तेजस्विनीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, अभिनेत्री लिपस्टिकचं समर्थन करत नसल्याचे म्हणत तिच्या ओठांवरील लिपस्टिक पुसते. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही. #banlipstick.” (Tejaswini pandit new video, saying ban lipstick, sparks questions amoung netizens)

तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया देऊन नक्की विषय काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या या व्हिडिओवर संजय जाधव यांनी कमेंट केली आहे की, “क्या हुआ है.” यासोबत तिचे अनेक चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. काहीजण म्हणत आहेत की, “एखादा नवीन चित्रपट येत असेल. प्रमोशनसाठी काहीही.” तसेच एका चाहत्याने “मॅडम तब्येत ठिक आहे ना,” अशी कमेंट केली आहे.

यासोबतच अभिनेत्री सोनाली खरे हिने देखील असाच व्हिडिओ शेअर करून तिच्या ओठांची लिपस्टिक पुसली आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने “माझा तेजस्विनीला पाठिंबा आहे,” असे लिहिले आहे. यातील खास गोष्ट म्हणजे संजय जाधवने या पोस्टवर देखील “काय झाले आहे?” अशी कमेंट केली आहे.

त्यामुळे आता संजय जाधव, तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे यांचा कोणता एकत्र प्रोजेक्ट येणार की काय? अशी सर्वत्र चर्चा चालू आहे. परंतु अजूनही या मागील नक्की कारण काय आहे. याची माहिती समोर आली नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बाबा जाऊ नको दूर…’, वडिलांच्या निधनाची माहिती देत, सायली संजीवने शेअर केली भावनिक नोट

-‘भावा कमाल आहेस तू’, म्हणत समीर चौगुलेकडून जवळच्या मित्राला वाढदिवसाच्या झक्कास शुभेच्छा!

-अरे भारीच ना! आता ‘अंजली बाई’ नव्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, तुम्हालाही आवडेल

हे देखील वाचा