Friday, April 19, 2024

‘बाबा जाऊ नको दूर…’, वडिलांच्या निधनाची माहिती देत, सायली संजीवने शेअर केली भावनिक नोट

‘काहे दिया परदेस’ या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. सोबतच मालिकेत अभिनय करून अभिनेत्री सायली संजीवही घराघरात पोहचली. तिच्या निरागस अभिनयाचे लाखो चाहते आहेत. अभिनेत्री या दिवसात सोशल मीडियावर अधिकच सक्रिय झाली आहे. बऱ्याचदा तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यांना चाहत्यांकडून खूप प्रेम मिळते. मात्र सदैव हसतमुख राहणाऱ्या सायलीवर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सायली संजीवच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांनी गुरुवारी (३० नोव्हेंबर) अखेरचा श्वास घेतला. सायली ही तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. त्यांच्या जाण्याने अभिनेत्री अक्षरशः तुटून गेली आहे. वडिलांना श्रद्धांजली वाहत, अभिनेत्रीने अतिशय भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतच्या काही आठवणी शेअर करून, डोळ्यात पाणी आणणारा मेसेज लिहला आहे. (sayali sanjeev shared emotional msg after her father’s death)

पोस्ट शेअर करत सायली म्हणतेय की, “तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं…दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू.. शहाणी होते मी, वेडा होता तू,..माझ्या साठी कारे सारा खर्च केला तू…आज तू फेडुदे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा.. बाबा, थांब ना रे तू…बाबा, जाऊ नको दूर….”

ही दुःखद बातमी समजताच चाहत्यांसह कलाकारांनी सायलीच्या वडिलांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

अभिनेत्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर झी मराठी चॅनलवरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेत सायलीने ‘गौरी’ची भूमिका साकारली होती. ‘गौरी’ची भूमिका साकारत, अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीही पाऊल ठेवले. तिने ‘पोलिस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकीरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा मराठी चित्रपटामध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनेक वर्षांपूर्वीच झाली होती ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’ची भविष्यवाणी! व्हायरल होतोय चित्रपटाचा पोस्टर

-कॉमेडियन कृष्णा अभिषेकने केली विकी- कॅटरिनाच्या लग्नाची गुप्त माहिती लीक, सांगितल्या महत्वाच्या गोष्टी

-Bigg Boss 15: प्रतीक सहजपालवर भडकली तेजस्वी प्रकाश; म्हणाली, ‘सांगू का, टास्कमध्ये तुझे हात कुठे कुठे लागतात?’

हे देखील वाचा