Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बघा.. पण प्रेमाने,’ तेजस्विनी पंडितच्या ग्लॅमने चाहते घायाळ, करतायेत कमेंट्सचा वर्षाव

तेजस्विनी पंडित ही मराठी चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ‘तुझं नि माझं घर श्रीमंतच’ या मालिकेत काम करून तिने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात तिचे स्थान निर्माण केले. यानंतर तिने चित्रपटात काम करून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत.

तेजस्विनीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने चंदेरी रंगाची सुंदर साडी नेसली आहे. तसेच यावर मॅचिंग ब्लाउज घातला आहे. गळ्यात हेवी ज्वेलरी घातली आहे. तसेच ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक आणि केसांमध्ये लाल रंगाची गुलाबाची फुले घातली आहेत. तिच्या केसातील ही फुले तिच्या सौंदर्यात आकर्षण ठरत आहे. फोटोमधील तिचा ग्लॅमरस अंदाज अनेकांना भुरळ घालत आहे. (Tejaswini pandit share her glamours photos on social media)

Tejaswini Pandit insta post
Photo Courtesy: Instagram/tejaswini_pandit

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “बघा.. पण प्रेमाने !” तिच्या या लूकवर अनेकांच्या कमेंट येत आहेत. तिच्या या फोटोवर प्रार्थना बेहेरे आणि सोनालीला खरे यांनी कमेंट्स केल्या आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “साडीला शोभा आली बघ तेजे.” आणखी एकाने कमेंट केली आहे की, “शक्य आहे का.. तुमच्याकडे रागाने किंवा तुच्छतेने बघणे?” तिचा हा लूक अनेकांना आवडला आहे. या फोटोला आतापर्यंत १० हजारापेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत. तसेच चाहते सातत्याने या फोटोवर कमेंट करत आहेत.

Tejaswini pandit
Tejaswini pandit instagram post

तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायिकाची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘रखेली’ या नाटकात काम केले. तिला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून खूप ओळख आणि लोकप्रियता मिळाली. तसेच तिने ‘तू ही रे’ या चित्रपटात काम करून सगळीकडे आपली ओळख निर्माण केली. या चित्रपटात तिच्यासोबत सई ताम्हणकर आणि स्वप्निल जोशी हे होते. तिची ‘अनुराधा’ नावाची वेब सिरीज नुकतेच प्रदर्शित झाली आहे. या सिरींजमधील तिचा लूक सगळ्यांना खूप आवडला आहे.

हेही वाचा :

कंगनाच्या प्रेमात इतका बुडालाय ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, पत्नीला घटस्फोट द्यायलाही आहे तयार

Birthday special: आमिर अलीसोबत ८ वर्षांचे नाते संपल्यानंतर, मुलगी बनली संजीदा शेखच्या जीवनाचा आधार

चिंतेत असलेल्या अनुष्का अन् विराटने मीडिया अन् चाहत्यांकडे केली ‘ही’ विनंती, पोस्ट व्हायरल

 

 

हे देखील वाचा