मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकीच एक आहे तेजस्विनी पंडित. सोशल मीडियावर तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी संपर्कात असते. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. अशामध्ये तिचे नुकतेच समोर आलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहून, चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडत आहेत.
तेजस्विनीने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात अभिनेत्रीचे वेगवेगळे मूड पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, मूडसोबत तेजस्विनीचे वेगवेगळे एक्सप्रेशन्स देखील पाहायला मिळत आहेत. यातील तिचा गोंडस अंदाज पाहून, तुम्हीही सहज तिच्या प्रेमात पडाल. यात नेहमीप्रमाणे अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (tejaswini pandit shared her different kinds of mood on social media see here)
हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हे माझे मूड! आज तुमचे मूड कसे आहेत?” आता या फोटोवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. चाहते फोटोखाली कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. इतकेच नव्हे, तर अभिनेता स्वप्नील जोशीने देखील तिच्या या फोटोवर ‘इमोजीझ!!!’ अशी कमेंट केली आहे. शिवाय आतापर्यंत या फोटोवर २२ हजाराहून अधिक लाईक्स आलेले पाहायला मिळत आहेत.
तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने केदार शिंदे दिग्दर्शित, ‘अग्गं बाई अरेच्चा’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ती एका वास्तविक कथेवर आधारित, मी ‘सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसली. या चित्रपटाने तिला बरीच ओळख मिळवून दिली. यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तेजस्विनी अखेरच्या वेळेस ‘समांतर’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप
-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक
-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ