Tuesday, July 9, 2024

‘गुलाबाची कळी’ तेजस्विनी पंडितचा सुंदर लूक पाहून कलाकारांसोबत चाहतेही झाले ‘शायर’, म्हणतायत…

तेजस्विनी पंडित मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय नामांकित आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव असण्याबरोबरच, ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. बर्‍याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. ही मराठमोळी अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. तिच्या या पोस्ट्सला चाहत्यांकडूनही खूप प्रेम मिळते. त्यामुळे तिचे फोटो बरेच व्हायरल होत असतात.

अशातच तेजस्विनीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ती अप्रतिम दिसत आहे. तिने हिरव्या रंगाचा एक सुंदर स्टायलिश ड्रेस परिधान केला आहे. यावर तिने एक रंगीबेरंगी कमरेचा बेल्ट लावला आहे. पायात हाय हिल्स कानात अत्यंत आकर्षक इअरिंग घातले आहेत. तसेच तिने कर्ली हेअर्स‌ करत केसांना देखील वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. या लूकमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत असून, या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Tejswini pandit share her latest photo on social media)

तिच्या चाहत्यांना नेहमी प्रमाणेच तिचा हा लूक खूप आवडला आहे. अनेकजण सातत्याने कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तर अनेक चाहते देखील तिच्या या स्टायलिश लूककडे आकर्षित झाले आहेत. तेजस्विनीच्या या लूकवर अभिनेत्री अभिज्ञा भावे, ऋतुजा बागवे, क्रांती रेडकर यांनी कमेंट केल्या आहेत. तर तेजस्विनीचा अत्यंत जवळचा मित्र सिद्धार्थ जाधव याने देखील कमेंट केली आहे. त्याने “अगो बाई” अशी कमेंट केली आहे. तर तिच्या एका चाहत्याने लिहिले की, “आप की आँखो मैं कुछ महके हुये से राज है, आप से भी खुबसुरत आपके अंदाज है.”

तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायिकाची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘रखेली’ या नाटकात काम केले. तिला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून खूप ओळख आणि लोकप्रियता मिळाली. तसेच तिने ‘तू ही रे’ या चित्रपटात काम करून सगळीकडे आपली ओळख निर्माण केली.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा