‘आरआरआर‘ (RRR) चित्रपटातील ‘नातू नातू’ या गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला. त्याला ऑस्कर पुरस्कारही मिळाला. ‘आरआरआर’ चित्रपटातील या गाण्याला ९५ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला. गायक राहुल सिपलीगंज यांनी आपल्या मधुर आवाजाने हे गाणे सजवले. रविवारी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या गाण्यासाठी राहुलला १ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी गायक राहुल सिपलीगुंज यांना दिलेले वचन पूर्ण केले. खरंतर, त्यांनी गायकाला १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे वचन दिले होते. आता अखेर त्यांनी हे वचन पूर्ण केले आहे. रविवारी ‘बोनालू’ महोत्सवानिमित्त राज्य सरकारने ही घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले की, हैदराबादच्या जुन्या शहरातील राहुल सिपलीगुंज यांनी ‘आरआरआर’ चित्रपटातील गाण्यासाठी ऑस्कर जिंकून जगभरात प्रसिद्धी मिळवली. ते तेलंगणातील तरुणांसाठी एक उदाहरण आहेत.
२०२३ मध्ये, जेव्हा रेवंत रेड्डी तेलंगणा प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल सिपलीगुंज यांना १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांनी असेही वचन दिले होते की जेव्हा काँग्रेस सरकार येईल तेव्हा त्यांच्या गाण्यांद्वारे राज्याचे नाव उंचावण्यासाठी त्यांना १ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. गेल्या महिन्यात ‘गदर तेलंगणा चित्रपट पुरस्कार’ समारंभात, मुख्यमंत्र्यांनी गायकाला दिलेल्या वचनाची आठवण करून दिली आणि राज्य सरकार लवकरच या संदर्भात घोषणा करेल असे आश्वासन दिले.
सीएम रेड्डी यांनी आता बोनालू उत्सवादरम्यान गायकासाठी 1 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करून आपले वचन पूर्ण केले आहे. ‘आरआरआर’ हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. एसएस राजामौली यांनी याचे दिग्दर्शन केले होते. ‘नातू नातू’ हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले होते. राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव यांनी ते गायले. ‘RRR’ चित्रपटात राम चरण, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट सारखे स्टार्स होते. ‘नाटू नातू’ हे गाणे राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
बिग बॉसमध्ये ३१ वर्षांनी लहान असलेल्या जसलीनशी नाव जोडल्याबद्दल अनुप जलोटाचे स्पष्टीकरण
मोठमोठ्या सिनेमांना सैयाराने चाखवली धूळ, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन