चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का! अभिनेत्री कनुप्रियाचे निधन, कोरोनाने घेतला जीव

Television actress Kanupriya's death due to covid 19


देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे संपूर्ण जनतेला घरातच बसावे लागत आहे. वैद्यकीय सुविधा पुरवताना डॉक्टरांवर ताण येत आहे. वैद्यकीय सुविधांचा तुटवडा पडल्याने अनेकांचे जीव जात आहेत. या विषाणूने चित्रपटसृष्टीवर देखील मोठा आघात केला आहे. अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे, तर अनेकांना त्यांचे जीव गमवावे लागले आहेत.

अशातच चित्रपटसृष्टीवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ब्रह्मकुमारी मधील लोकप्रिय एँकर असलेली टीव्ही अभिनेत्री कनुप्रिया हिचे कोरोनाने निधन झाले आहे. या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे.

कनुप्रिया हिच्या मृत्यूचे कारण कोरोना असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी तिला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर आता थेट तिच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या बहिणीने शिवानीने सोशल मीडियावर कनुप्रियाच्या निधनाची बातमी दिली आहे. तिने कनुप्रियाचा फोटो शेअर करून सांगितले की, कोरोनामुळे तिचे निधन झाले आहे.

शिवानीने कनुप्रियाच्या निधनाची दुःखद बातमी सांगताना लिहिले आहे की, “ओम शांती एन्जिल्स. काल रात्री एक सुंदर परी कनुप्रिया हिचे निधन झाले आहे. कनुप्रिया एक शुद्ध आत्मा, दयाळू आणि निस्वार्थ मनाची मुलगी होती. तिचा उद्देश खूप वेगळा आणि उच्च विचारांचा होता. आपल्याला ही गोष्ट माहीत आहे की, भले ही वेशभूषा बदलली तरी ती नेहमीच देवदूत राहील. तिचा प्रत्येक जन्म एक नवीन जग निर्माण करण्यासाठी समर्पित असणार आहे. ओम शांती.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काळीज तोडणारी बातमी! अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचे निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती

-कोरोना काळात औषधांचा काळा बाजार करणाऱ्यांवर संतापला अभिनेता आर माधवन; म्हणाला…

-‘कपडे काढ, मग कळेल तू भूमिकेसाठी योग्य आहेस की नाही!’ ग्लॅमरच्या विश्वाबद्दल अभिनेत्रीने केला मोठा खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.