Thursday, October 16, 2025
Home अन्य पिवळ्या रंगाचा ‘बार्बी’ ड्रेस घालून रश्मी देसाई रंगली प्रेमाच्या रंगात; पाहायला मिळाला घायाळ करणारा ग्लॅमरस अंदाज

पिवळ्या रंगाचा ‘बार्बी’ ड्रेस घालून रश्मी देसाई रंगली प्रेमाच्या रंगात; पाहायला मिळाला घायाळ करणारा ग्लॅमरस अंदाज

‘उतरण’ या मालिकेतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई. तिने अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पण ‘बिग बॉस १३’ नंतर ती चांगलीच चर्चेत आली होती. तिच्या फॅशन सेन्सने तिने सर्वांनाच वेड लावले होते. त्यानंतर देखील ती सोशल मीडिया पोस्टवरून सातत्याने चर्चेत राहिली आहे. तिचे बोल्ड आणि हॉट फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे अत्यंत क्यूट आणि ग्लॅमरस फोटो तिने शेअर केले आहेत.

रश्मीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पिवळ्या रंगाचा शॉर्ट फ्रॉक परिधान केला आहे. तसेच तिने पायात ग्रे कलरचे हाय हिल्स घातले आहेत. हातात छत्री घेऊन तिने पोझ दिल्या आहेत. या फोटोमध्ये ती एखाद्या बार्बी डॉलपेक्षा कमी सुंदर दिसत नाही. हे फोटो शेअर करून तिने “रोमँटिसिझम” असे कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. तसेच तिच्या दिलखुलास पोझ पाहून चाहते देखील पुरते तिच्या प्रेमात पडले आहेत. केवळ दोन तासापूर्वी शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यँत दीड लाखापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर चार हजारापेक्षाही जास्त कंमेंट आल्या आहेत. चाहते तर नुसते या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तसेच चाहते हा फोटो खूप शेअर करत आहेत. (television actress rashmi desai share her yellow dress cute photos on social media)

रश्मीने २००६ साली ‘रावण’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. तसेच ‘ये लम्हे जुदाई के’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिने टीव्ही सीरियलमध्ये काम करून नाव कमावले. तिने ‘उतरण’, ‘दिल से दिल तक’, ‘नागीण ४’, ‘भाग्य का जहरीला खेल’, या मालिकांमध्ये काम केले आहे. या व्यतिरिक्त ती अनेक रियॅलिटी शोमध्ये देखील स्पर्धक होती. तिने ‘जरा नच के दिखा’, ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी’, ‘नच बलिये’, ‘बिग बॉस १३’ यामध्ये भाग घेतला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…माझ्या मुलांसाठी आमच्या खासगी आयुष्याचा आदर करा’; ट्रोलिंगला कंटाळलेल्या शिल्पाने सोशल मीडियावर जारी केले स्टेटमेंट

-‘ये लाल इश्क, ये मलाल इश्क’, लाल साडीत खुललं आर्चीचं सौंदर्य; फोटोमधील लूकने चाहत्यांना पाडली भुरळ

-रणवीर सिंग का घालतो ‘असे’ कपडे? अभिनेत्याने स्वत: सांगितले त्याच्या अतरंगी फॅशन सेन्समागचे कारण

हे देखील वाचा