बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग चित्रपटातील त्याच्या जबरदस्त अभिनयामुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. त्याचसोबत त्याची स्टाईल आणि विशेषतः त्याच्या ड्रेसिंग सेन्समुळे सुद्धा तो अनेकदा चर्चेत येत असतो. त्याच्या प्रत्येक नवीन फोटोमध्ये त्याचा नवीन रंगबेरंगी पोशाख आपल्याला पाहायला मिळतो. कधीकधी तो यावर अतरंगी चष्मे सुद्धा घालतो. मात्र, रणवीर असं का करतो? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. अशात या प्रश्नाचं उत्तर स्वतः रणवीरने दिलं आहे.
साल 2019मध्ये ‘फादर्स डे’च्या निमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर वडिलांचा एक फोटो शेअर केला होता. जगजीत सिंग भवनानी असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. शेअर केलेल्या फोटोत पाहण्यासारखी गोष्ट ही होती की, रणवीरच्या वडिलांनी सुद्धा स्टायलिश जॅकेट घातले होते. त्यांची हेेअरस्टाईल सुद्धा स्टायलिश होती, जसे की रणवीर सिंगची असते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये रणवीरने लिहिले होते की, “आता तुम्हाला समजलंच असेल…हॅपी बीस्ट…हॅपी फादर्स डे, आई लव यू पापा.” या फोटोचा इशारा देत रणवीरने त्याच्या ड्रेसिंग सेंसचे कारण आपले वडील असल्याचे चाहत्यांना सांगितले.
फिल्म कंपेनियन या अनुपमा चोप्राच्या चॅनेलसोबत बोलताना रणवीरने सांगितले की, तो रंगबेरंगी पोशाख घालून वेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असतो. याचे कारण की, या जगातील लोक खूप तणावग्रस्त आहेत. त्यांना जीवनात आनंद शोधता येत नाही आणि दिवसभरात असा एखादा क्षण सुद्धा ते काढू शकत नाहीत, की ज्यात ते आनंदी होतील. त्यामुळेच मी माझे असे फोटो शेअर करतो, जेणेकरून माझ्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर हास्य येईल.
रणवीर सिंग त्याच्या रंगीबेरंगी ड्रेसिंग स्टाइलचे कारण काहीही सांगत असला, तरी त्याला लोक काय म्हणतील या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. एक वेळेस तर दीपिका सुद्धा म्हणाली होती की, “रणवीरचा ड्रेसिंग सेंस मलाही सहन करावा लागतो.”
एका शोमध्ये दीपिकाने सांगितले की, “जेव्हा माझ्या आईवडिलांना भेटायचे असते, तेव्हा रणवीरचा ड्रेस कोड व्हाइट शर्ट आणि ब्ल्यू जीन्स असतो आणि जेव्हा काही कौटुंबिक कार्यक्रम असतो, तेव्हा पादुकोण कुटुंबाप्रमाणे कपडे घालावे लागतात. जसे की ब्लॅक पॅन्ट, ब्ल्यू जीन्स, व्हाइट शर्ट किंवा राऊंड नेक टी शर्ट.” रणवीर सिंगला अनेकदा त्याच्या अतरंगी फॅशन सेंसमुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. (what is the secret of ranveer singh dressing sense)
‘या’ कारणास्तव समंथाने सिनेसृष्टीतून घेतला ब्रेक, निर्मात्यांचा अॅडव्हान्सही केला परत
पद्मावतमधील अलाउद्दीन खिलजी भूमिकेसाठी रणवीर सिंग नाही तर ‘हा’ अभिनेता होता भन्साळी यांची पहिली पसंती