Wednesday, October 15, 2025
Home अन्य धर्मेश इज बॅक! कोरोनावर मात करत कोरिओग्राफर पोहोचला ‘डान्स दीवाने ३’ च्या मंचावर

धर्मेश इज बॅक! कोरोनावर मात करत कोरिओग्राफर पोहोचला ‘डान्स दीवाने ३’ च्या मंचावर

कोरोनामुळे सगळीकडेच वातावरण खराब झाले आहे. काही लोक घाबरून घरातच बसले आहेत, तर काही लोकांना आपले रोजचे पोट भरायला बाहेर पडावे लागत आहे. सामान्य लोकांसमवेत अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. यातच आनंदाची बाब म्हणजे योग्य ते उपचार घेत अनेक कलाकार यातून बाहेर पडले आहेत. कलर्स टीव्हीच्या ‘डान्स दीवाने ३’ या रियॅलिटी शोचा परीक्षक आणि कोरिओग्राफर धर्मेश येलांडे याचा कोरोना अहवाल नुकताच निगेटिव्ह आला आहे.

आगामी भागामध्ये धर्मेश हा तुषार आणि नोरा फतेहीसोबत एकत्र दिसणार आहे. धर्मेश २७ एप्रिल रोजी सकाळी बंगळुरूला पोहोचला आहे. बर्‍याच दिवसानंतर तो मंचावर आपल्या टीमला भेटून खूप आनंदी झाला आहे. धर्मेशच्या चाहत्यांसाठीही ही खूप चांगली बातमी आहे.

कोरोनामुळे सगळ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. ‘डान्स दीवाने ३’ रियॅलिटी शोही याला अपवाद नाही. या शोचे प्रथम १८ क्रू मेंबरला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाच्या या स्फोटानंतर निर्मात्यांनी सुरक्षा व्यवस्था आणखी कठोर केली होती. तरीही, या शोचे तीन स्पर्धक उदय सिंग, अरुंधती आणि सुचना यांना कोरोनाने आपल्या जाळ्यात खेचले होते. इतकेच नव्हे, तर शूटिंगपूर्वी झालेल्या कोरोना चाचणीत शोचे परीक्षक धर्मेश आणि निर्माते अरविंद राव दोघेपण पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवले होते.

शोचे निर्माते राव यांनी सांगितले की, “आम्ही सर्व सावधगिरी बाळगत आहोत, आणि कोरोना रिपोर्ट्सशिवाय सेटमध्ये कोणालाही परवानगी दिली जात नाही आहे. पण तरीही कोरोना साथीचा त्रास आम्हाला होत आहे.” आजही कोरोना टेस्टशिवाय कोणत्याही सदस्याला सेटवर प्रवेश दिला जात नाहीये.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुख खानपूर्वी ‘भाईजान’ सलमान खानला ऑफर झाला होता ‘चक दे इंडिया’, चित्रपट नाकारण्यामागे होते ‘हे’ कारण

-कॅन्सरशी लढत असलेल्या अभिनेत्री किरण खेर कोरोना रुग्णांच्या मदतीला, व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी दिले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये

-युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने पार्कमध्ये केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ पाहून तुम्हीही थिरकाल

हे देखील वाचा