Wednesday, July 3, 2024

बापरे! ‘या’ गंभीर आजारामुळे ‘अनुपमा’ फेम अभिनेत्रीला अपत्याला जन्म देणे झाले होते कठीण, मुलाला म्हटले ‘चमत्कार’

कोरोनाने सगळीकडेच पुन्हा एकदा हात पसरायला सुरुवात केली आहे. सामान्य लोकांसोबतच अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. काही कलाकारांनी कोरोनामुळे जगाचा निरोप घेतला, तर काही कलाकार यातून बरे होत पुन्हा एकदा सोशल मीडियावर झळकताना दिसतायत. टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली ही तिची मालिका अनुपमामधून जेवढी चर्चेत असते, तेवढीच तिच्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. अलीकडेच रुपालीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती, त्यानंतर अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला होता.

तिने तिच्या आयुष्याशी संबंधित एक महत्त्वाचा खुलासा केला आहे, जो चांगलाच चर्चेत आहे. एका मुलाखती दरम्यान रुपालीने बर्‍याच प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तसेच अनेक खुलासे केले आहेत. यादरम्यान, रूपालीने सांगितले की, तिला गर्भधारणेदरम्यान बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. डॉक्टरांच्या अनेक प्रयत्नांनंतर तिला मुलगा झाला, ज्याला ती चमत्काराप्रमाणे मानते.

रूपाली पुढे म्हणते की, आई होणे ही माझ्या जीवनाची खास ‘महत्वाकांक्षा’ होती, परंतु तब्येत वाढल्यामुळे, मला गर्भवती होणे सोपे नव्हते. तिचा असा विश्वास आहे की, मुलगा रुद्रांश हा त्यांच्यासाठी एक चमत्कार आहे. ती पुढे म्हणते, “मला थायरॉइडची मोठी समस्या होती, ज्यामुळे प्रजनन क्षमता कमी झाली होती. अनेक समस्यांमुळे मला डॉक्टरांकडे सतत जावे लागायचे, तेव्हा कुठे जाऊन मग मी मुलाला जन्म देऊ शकले.”

याशिवाय रुपालीनेही बर्‍याच प्रश्नांची उत्तरे दिली. गेल्या काही वर्षांत टीव्हीपासून दूर राहण्याच्या प्रश्नावर रूपाली सांगते की, “लग्न करणे आणि मूल होणे हे माझे ध्येय होते, आणि शेवटी मी एक आई झालेच. त्यानंतर मला आयुष्यात काहीही नको.” पुढे बोलताना ती म्हणाली की, “अनुपमा मालिकेत काम काम करण्याची संधी मिळाली नसती, तर मी आणखी मोठा ब्रेक घेतला असता.”

तिने टीव्हीवर ‘सुकन्या’ या मालिकेतून पदार्पण केले. यानंतर तिने ‘संजीवनी’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘परवरीश’ या मालिकेत देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोपा नव्हता मनोज वाजपेयी यांचा चित्रपट प्रवास, वडिलांना शेतात करायचे मदत, बिग बींचा ‘हा’ चित्रपट पाहून धरली अभिनयाची वाट

-एव्हरग्रीन ‘शोले’ चित्रपट निर्मितीची कहाणी आहे खूपच रंजक, ‘अशाप्रकारे’ अमजद खान बनले होते ‘गब्बर’

-दिवंगत अभिनेते राजकुमार यांनी थेट तोंडावर केला ‘या’ कलाकारांचा अपमान, गोविंदाचा शर्टच बनवला होता रुमाल

हे देखील वाचा