Thursday, April 24, 2025
Home अन्य ‘पवित्र रिश्ता’ मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला; पण सुशांतसह ‘या’ अभिनेत्रीला चाहते करणार मिस

‘पवित्र रिश्ता’ मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला; पण सुशांतसह ‘या’ अभिनेत्रीला चाहते करणार मिस

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ ही घराघरात पोहोचलेली मालिका आहे. एके काळी या मालिकेने सर्वांना अक्षरशः वेड लावले होते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने सर्वांचे मन जिंकले होते. खास करून या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे कलाकार अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांची जोडी खूप लोकप्रिय होती. या मालिकेने 2014 मध्ये सगळ्या प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले होते. हाती आलेल्या माहितीनुसार, या मालिकेच डिजिटल व्हर्जन तयार होणार आहे. या मालिकेमध्ये दोन कलाकार नसणार आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, या मालिकेतील ज्येष्ठ कलाकार उषा नाडकर्णी या मालिकेत दिसणार नाहीत. या मालिकेत त्यांनी सुशांत सिंग राजपूत यांच्या आईची म्हणजेच सविता ताईची भूमिका निभावली होती. त्यांच्या बेधडक अभिनयाने त्यांनी सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. परंतु त्या आता या मालिकेचा भाग नसणार आहेत.

पिंकवाला यांच्या माहितीनुसार, उषा नाडकर्णी यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, “माझे कुटुंब खूप टेन्शनमध्ये आहे. माझे वय 77 आहे. मला मधुमेह आहे. त्यामुळे माझ्या घरच्यांना नाही वाटत की, मी आता या परिस्थितीत कोणतीही रिस्क घ्यावी. मी मराठी बिग बॉसमध्ये देखील स्पर्धक होते. तिथे मी 77 दिवस राहिले होते. यानंतर मला हिंदी व्हर्जनमध्ये देखील बोलावले होते. तिथे मी 15 दिवस राहणार होते. सगळं काही फायनल होते. परंतु माझ्या मुलाने मला या शोमध्ये जाण्यास नकार दिला. कोणाला माहित कोण इन्फेक्शन घेऊ येत आहे.”

https://www.instagram.com/p/CPP3dUtB9Pf/?utm_source=ig_web_copy_link

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या दुसऱ्या भागाची जेव्हापासून घोषणा झाली आहे, तेव्हापासून प्रेक्षक खूप उत्साहित आहेत. या मालिकेतील मुख्य भूमिका निभावणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू झाला होता. त्याने या मालिकेत मानव नावाचे पात्र निभावले होते. आता मनित जौरा हे पात्र निभावताना दिसणार आहे. त्यामुळे आता सुशांत सोबत उषा नाडकर्णी यांना देखील प्रेक्षक या मालिकेत खूप मिस करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा