Monday, September 16, 2024
Home टेलिव्हिजन सर्वाधिक कर भरणाऱ्यांच्या यादीत कपिल शर्माचेही नाव; तब्बल २६ कोटींचा भरला आहे यावर्षी कर…

सर्वाधिक कर भरणाऱ्यांच्या यादीत कपिल शर्माचेही नाव; तब्बल २६ कोटींचा भरला आहे यावर्षी कर…

२०२४ साठी शीर्ष सेलिब्रिटी करदात्यांची यादी बाहेर आली आहे. यावेळी या यादीत बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सर्वाधिक टॅक्स भरणारा सेलिब्रिटी बनला आहे. या यादीत कॉमेडियन कपिल शर्मा टीव्हीचा सर्वाधिक कर भरणारा ठरला आहे. कपिल शर्मानेही या बाबतीत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान आणि कतरिना कैफला मागे टाकले आहे.

फॉर्च्यून इंडियानुसार, कपिल शर्माने FY24 मध्ये २६  कोटी रुपयांचा कर भरला आहे. या यादीत शाहरुख खान ९२ कोटींचा कर भरून पहिल्या क्रमांकावर आहे. थलपथी विजयने ८० कोटी रुपयांचा कर भरला आहे. यानंतर सलमान खानने ७५ कोटींचा कर भरला आहे. बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन ७१ कोटींच्या कर भरणासह चौथ्या स्थानावर आहेत.

कपिल शर्मा टीव्हीच्या सर्वात श्रीमंत स्टार्सपैकी एक आहे. त्याने २०१३ मध्ये कॉमेडी नाइट्स विथ कपिल हा टीव्ही शो होस्ट करण्यास सुरुवात केली. २०१६ मध्ये, हा शो सोनी टीव्ही चॅनेलवर हलविला गेला आणि नंतर त्याचे नाव कपिल शर्मा शो ठेवण्यात आले. यासह तो टेलिव्हिजनमधील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत स्टार बनला. त्याने अनेक चित्रपटांमध्येही अभिनय केला, पण त्याचा एकच चित्रपट ‘किस किसको प्यार करूं’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.

कपिलची एकूण संपत्ती 300 कोटी रुपये आहे. या वर्षी कपिलने टेलिव्हिजन सोडले. आणि त्याचा शो नेटफ्लिक्सवर शिफ्ट झाला. द ग्रेट इंडियन कपिल शो नेटफ्लिक्सवर साप्ताहिक भागांमध्ये रिलीज  झाला आणि अशा प्रकारे, तो जगभरातील १९२ देशांमध्ये पोहोचला. नुकत्याच झालेल्या शोसाठी कपिलने एका एपिसोडसाठी तब्बल ५ कोटी रुपये आकारले होते. कपिल आज विलासी जीवन जगतो आणि त्याची एकूण संपत्ती ३०० कोटी रुपये आहे.

कपिल मुंबईत करोडोंच्या घरात राहतो. कपिल अंधेरी पश्चिम भागात राहतो. आलिया भट्ट, नवाजुद्दीन सिद्दीकी, मिका सिंग आणि सोनू सूद यांसारख्या सेलिब्रिटींचीही या पॉश भागात घरे आहेत. कपिलच्या मुंबईतील आलिशान घराची अंदाजे किंमत १५ कोटींहून अधिक आहे. याशिवाय कपिलचे पंजाबमध्ये एक फार्महाऊस आहे, ज्याची किंमत २५ कोटींहून अधिक आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –   

तब्बल ८० कोटींचा कर भरलाय थालापथी विजयने; एकूण संपत्ती ऐकून व्हाल थक्क

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा