थालापथी विजय हे साऊथ इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. त्याने वयाच्या १० व्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि आज तो सर्वत्र आहे. थालापथी विजयसमोर बॉलीवूड कलाकारही नतमस्तक होतात. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले आणि तेव्हापासून ते सुपरस्टार राहिले. थालापथी विजय दोन दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत आहे आणि इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. अलीकडेच सर्वाधिक कर भरणाऱ्या कलाकारांची यादी समोर आली आहे. ज्यामध्ये थलपथी विजय दुसऱ्या क्रमांकावर आहे. थालापथीची कमाई ऐकून तुम्ही थक्क व्हाल…
फॉर्च्युन इंडियाचा एक अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये शाहरुख खानने आर्थिक वर्ष २०२४ साठी सर्वाधिक कर भरला आहे. त्याने ९२ कोटी रुपयांचा कर भरला आहे. तर थालापथी विजयने ८० कोटी कर भरून दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. या यादीत सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांचीही नावे आहेत. भाईजानने ७५ कोटी रुपये तर बिग बींनी ७१ कोटी रुपये टॅक्स भरला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार थालापथीची एकूण संपत्ती ६०० कोटी रुपये आहे. अहवालानुसार, त्याचे वार्षिक उत्पन्न देखील २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
थालापथी विजयचा ‘गॉट’ हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्याने या चित्रपटासाठी २०० कोटी रुपये घेतले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, विजय अनेक ब्रँड्सची जाहिरात करून पैसे कमावतो. स्टार्स ब्रँड्सचे समर्थन करण्यासाठी ४ -५ कोटी रुपये घेतात. फक्त ब्रँड्सची जाहिरात करून तो वर्षाला १० कोटी रुपये कमावतो.
थालापथी विजय त्याची पत्नी संगीता सोरनालिंगम आणि दोन मुले जेसन संजय आणि दिव्या साशा यांच्यासह समुद्रकिनारी एका आलिशान बंगल्यात राहतात. चेन्नईच्या नीलंकराई भागात कॅसुआरिना ड्राईव्ह स्ट्रीटवर अभिनेत्याचे घर आहे. विजयचे आलिशान घर हॉलीवूड अभिनेता टॉम क्रूझच्या बीच हाऊसपासून प्रेरित आहे. आपल्या अमेरिका भेटीदरम्यान विजयने टॉम क्रूझचे बीच हाऊस पाहिले. यावरून प्रेरित होऊन विजयने फोटो काढला आणि अशाच एका बीच हाऊसची निर्मिती केली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
‘लोक तुमचा वापर करतात’; हिना खानची भावनिक पोस्ट, बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअपच्या चर्चा…