बॉलिवूड ही जगतातील सर्वोत्तम चित्रपटसृष्टी समजली जाते. या क्षेत्राच्या चित्रपटांची, अभिनेत्यांची नेहमीच सर्वत्र चर्चा पाहायला मिळते. हिंदी चित्रपट जगतातील अभिनेते त्यांच्या श्रीमंतीसाठी देखील ओळखले जातात. थोडक्यात या हिंदी चित्रपटसृष्टीतील झगमगाटी दुनियेची बात काही वेगळीच असते. मात्र आता या चित्रपट जगतात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचे कारणही गंभीर आहे.
हिंदी सिनेसृष्टीत सध्या सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. या क्षेत्रातील प्रत्येक निर्माता, कलाकार दिग्दर्शक सगळेच विचारात पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कारण अलीकडेच आलेल्या OTT फ्लॅटफॉर्मकडे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाला आहे. हिंदी चित्रपटांना अपेक्षित यशही मिळेनासे झाले आहे. आता नुकत्याच आलेल्या रीपोर्टकार्डमूळे या क्षेत्रातील सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. कारण आजपर्यंत सर्वात श्रीमंत चित्रपटसृष्टी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या बॉलिवूडची हवा हळूहळू कमी झालेली पाहायला मिळत आहे. यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटांनी बाजी मारली असून त्यांच्या कमाईच्या आकड्यांनी हिंदी चित्रपट जगतातील सर्वांचीच झोप उडवली आहे.
आधीच गेल्या तीन वर्षांपासून आलेल्या महाभयंकर रोगाचा मोठा फटका चित्रपट जगतात बसला आहे. समोर आलेल्या आकड्यांनुसार 2020 आणि 2021 मध्ये तयार झालेल्या चित्रपटांची कमाई फक्त 5757 कोटी इतकी आहे. ही सगळी कमाई 2019 मध्ये एकाच वर्षात झालेल्या कमाईपेक्षा तब्बल 5000 कोटी रुपयांनी घटली आहे. यामध्ये सगळ्यात मोठा फटका गेल्यावर्षी आलेल्या चित्रपटांना बसला आहे. आधीच्या वर्षापेक्षा यंदाची कमाई 81% घसरली आहे. शेवटच्या महिन्यात पून्हा चित्रपटगृह चालू झाल्याने थोडा दिलासा मिळाला होता, नाहीतर ही कमाई फक्त 2056 कोटी इतकीच राहिली असती.
मीडिया रीपोर्टनुसार मागच्या 2 वर्षात चित्रपटांची कमाई खूपच कमी झाली आहे. मागच्या वर्षीच्या जानेवारी ते मार्चपासून त्याच्या आधीच्या जानेवारी आणि मार्च महिन्यापर्यंत ही कमाई चांगली झाली आहे. या महिन्यात झालेल्या 87% कमाईने दिलासा दिला आहे. सोबतच तिकिटांची विक्रमी विक्रीसुद्धा कमी झाली आहे. देशाच्या चित्रपटात सर्वात जास्त कमाई करणार्या चित्रपटांमध्ये हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत ही कमाई घटू लागली आहे. सोबतच हॉलिवूड चित्रपटांची कमाई सुद्धा कमी झाली आहे. या चित्रपटांची कमाई 15% असायची आता ती घटून 11 टक्के झाली आहे.
या सगळया आकड्यांमध्ये सर्वात धक्कादायक खुलासा झाला आहे. कारण चित्रपटाच्या कमाईमध्ये सर्वात जास्त कमाई दाक्षिणात्य चित्रपटांनी केली आहे. तामीळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांच्या कमाईने हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपटांना धोबीपछाड केला आहे. यांच्या कमाईचे आकडे हॉलिवूड चित्रपटांचीही चिंता वाढवणारे आहेत. 2019 मध्ये या चित्रपटांची कमाई 36% असायची ती वाढून आता 59% पर्यंत गेली आहे. म्हणजेच आता दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी चित्रपटसृष्टीला मागे टाकायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा :