Saturday, June 29, 2024

‘या’ अभिनेत्रींच्या नावावर चाहत्यांनी बांधली मंदिरे, यादी पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी एकही संधी साेडत नाही. काहीजण सायकलने मैल दूर प्रवास करतात, तर काही टॅटू काढून कलाकरांविषयी आपले प्रेम व्यक्त करतात. स्टार्सबद्दल चाहत्यांच्या क्रेझची अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांची लोक देवीप्रमाणे पूजा करतात. या दाक्षिणात्य अभिनेत्रींवर त्यांचे अपार प्रेम व्यक्त करण्यासाठी चाहत्यांनी त्यांची मंदिरे बांधली आहेत, जिथे त्यांची पूजा केली जाते. चला तर मग पाहूया या यादीत काेणकाेणत्या अभिनेत्रींचा समावेश आहे.

खुशबू
खुशबूने 1988 मध्ये धर्मथिन थलायवन या तमिळ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. खुशबू ही पहिली टाॅलिवूड अभिनेत्री आहे, जिच्या नावावर चाहत्यांनी तिरुचिरापल्ली, तमिळनाडू येथे मंदिर बांधले. मात्र, लग्नानंतर अभिनेत्रीच्या काही आक्षेपार्ह विधानांमुळे चाहत्यांची निराशा झाली आणि त्यांनी तिचे मंदिर पाडले.

नमिता
नमिता ही एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने तमिळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम करते. 2008 मध्ये जेव्हा नमिता तिच्या स्टारडमच्या शिखरावर होती, तेव्हा एका भक्ताने तिच्यासाठी तामिळनाडूमध्ये एक मंदिर बांधले. खुशबू नंतर नमिता दुसरी अभिनेत्री हाेती जिच्या सन्मानार्थ मंदिर बांधण्यात आले.

निधी अग्रवाल
निधी अग्रवालची फॅन फॉलोइंग साऊथमध्ये खूप जबरदस्त आहे. निधीने दोन चित्रपट केल्यानंतर, 2021मध्ये चाहत्यांनी चेन्नईमध्ये तिचे मंदिर बांधले आणि तिची पूजा करण्यास सुरुवात केली. निधीची मूर्ती मंदिरात स्थापित केली आहे आणि तिची आरती दूध अर्पण करून केली जाते. जेव्हा अभिनेत्रीला हे समजले तेव्हा तिला चांगलाच धक्का बसला.

हंसिका मोटवानी
हंसिका मोटवानी गेल्या दहा वर्षांपासून चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. पडिकाथवन या चित्रपटातून हंसिकाने जेव्हा टाॅलीवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला, तेव्हा लोकांनील हंसिकाची तुलना अभिनेत्री खुशबूसोबत करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिच्या समर्थकांनी अभिनेत्रीसाठी इरादा मदुराईमध्ये मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता.

नयनतारा
साऊथची लाेकप्रिय अभिनेत्री नयनताराने तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवली आहे. या अभिनेत्रीला टाॅलिवूडची राणी म्हणूनही ओळखले जाते. चाहते अभिनेत्रीला देवी मानत असून त्यांनी तिचे 2014मध्ये मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र, अभिनेत्रीने स्पष्टपणे नकार दिल्याने हे काम पुढे जाऊ शकले नाही.(temple dedicated to south actresses kushboo sundar nidhhi agerwal namitha nayanthara hansika motwan)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ शोमधून ‘या’ महत्त्वाच्या व्यक्तीची एक्झिट

शाहरुख खानच्या चाहत्यांना मोठा झटका, सिनेमागृहात ‘पठाण’ रिलीज होणारच नाही?

हे देखील वाचा