Friday, July 5, 2024

‘आता तो खूप बदलला आहे’, म्हणत भूमिका चावलाने तिच्या ‘या’ सहकालाकराबद्दल केला मोठा खुलासा

बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा(Salman Khan) ‘तेरे नाम’ चित्रपट आठवला की सर्वांच्याच डोळ्यासमोर निर्जराची शांत, मनमोहक भूमिका उभी राहते. या चित्रपटातील निर्जराची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच भूमिका चावला (Bhumika Chavala). या चित्रपटाने हिंदी जगतात सलमान खानला नवी ओळख तर दिलीच पण अभिनेत्री भूमिका चावलालाही रातोरात स्टार केले. चित्रपटात सलमान खानच्या प्रेयसीची भूमिका साकारणाऱ्या निर्जराच्या अभिनयाचे प्रेक्षकांने चांगलेच कौतुक केले होते. संपूर्ण चित्रपटात सलमान खान तिच्या लवस्टोरीची अनोखी केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. सध्या चित्रपट जगतात फारशी सक्रिय नसलेल्या भूमिकाने तिच्या आणि सलमान खानच्या नात्याविषयी एका मुलाखतीत खुलासा केला होता.

‘तेरे नाम’ चित्रपटाने अभिनेता सलमान खान आणि भूमिका चावलाला नवी ओळख मिळवून दिली होती. 2003 मध्ये आलेल्या या चित्रपटाची कथा आणि गाण्यांनीही तरुणाईला वेड लावले होते. तेरे नाम मुळेच अभिनेत्री भूमिका चावलालाही सिनेसृष्टीत नवीन ओळख मिळवून दिली. मात्र पडद्यावर ज्या प्रमाणे सलमान खान आणि भूमिकाची केमिस्ट्री पाहायला मिळाली त्याच्या अगदी उलट त्यांचे खरे नाते होते ज्याचा खुलासा भूमिकाने एका मुलाखतीत केला होता. सलमान खानसोबत तिचे चांगले संबंध आहेत परंतु ती त्याच्या जास्त संपर्कात कधीही आली नाही असा खुलासा तिने केला होता.

सलमान खानला भेटून तु प्रभावित झालीस का? या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली की, “प्रभाव हा खूप वेगळा शब्द आहे. मी त्याच्या इतक्या संपर्कात नव्हते पण तो खूप बदलला आहे. आणि हे साहजिक आहे कारण जेव्हा तुम्ही तुमच्या 20 च्या दशकात असता तेव्हा तुम्ही तुमच्या 30 च्या दशकात वेगळे असता आणि नंतर तुम्ही तुमच्या 40 आणि 50 च्या दशकात पुन्हा बदलता. त्यामुळे तो बदलला आहे असे मला वाटते. कारण मी म्हटल्याप्रमाणे माझा सलमानशी फारसा वैयक्तिक संपर्क नाही.”

‘तेरे नाम’ व्यतिरिक्त भूमिकाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘रन’, ‘दिल से’, ‘एमएस धोनी’, खामोशी आणि ‘भ्रम’ यांचा समावेश आहे. लवकरच ती ‘ऑपरेशन रोमियो’मध्ये दिसणार आहे. हा मल्याळम चित्रपट इश्कचा रिमेक आहे, ज्यामध्ये तिच्या सह शरद केळकर, किशोर कदम, सिद्धांत गुप्ता आणि वेदिका पिंटो दिसणार आहेत. हा चित्रपट 22 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा