Monday, February 26, 2024

‘माचीस’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या जिम्मी शेरगीलने कॅरेक्टर भूमिकांमधून मिळवली तुफान प्रसिद्धी

बलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मुख्य अभिनेता म्हणून भरपूर काम केले मात्र त्यांना ओळख मिळाली ती त्यांच्या कॅरेक्टर भूमिकांमुळे. मुख्य अभिनेत्यांच्या भूमिका करून जेवढी लोकप्रियता मिळवली त्यापेक्षा अधिक लोकप्रियता कॅरेक्टर भूमिकांमुळे काही कलाकारांना मिळाली. यातलाच एक उत्तम अभिनेता म्हणजे जिमी शेरगील. जिम्मीने त्याच्या अभिनयाने त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिम्मी एक प्रतिभावान आणि हुशार अभिनेता म्हणून इंडस्ट्रीमध्ये ओळखला जातो. आज (३ डिसेंबर) जिमी त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.

जिम्मी शेरगीलचा जन्म ३ डिसेंबर १९७० रोजी उत्तरप्रदेशच्या गोरखपुर इथे झाला. जिम्मीने हिंदीसोबतच पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सुरूवातीला दिग्दर्शक होण्याच्या हेतूने आलेल्या जिम्मीला नशिबाने एका वेगळ्याच वळणावर नेले. जिम्मीने त्याचे शिक्षण लखनऊच्या सेंट फ्रांसिस कॉलेजमधून पूर्ण केले. पुढे तो पंजाबला गेला तिथे त्याने त्याचे शिक्षणपूर्ण करत पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. काम मिळवण्याच्या निमित्ताने तो मुंबईत आला. जिम्मी १८ वर्षापर्यंत पगडी घालायचा मात्र पुढे हॉस्टेलला आल्यानंतर त्यालानंतर त्याने पगडी काढून टाकत केस कापून टाकले. यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याच्याशी जवळपास एक वर्ष बोलणे टाकले होते.

जिम्मीने १९९६ साली आलेल्या ‘माचीस’ सिनेमातून त्याच्या अभिनयाला सुरुवात केली. हा सिनेमा तुफान गाजला. त्यानंतर त्याने अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरुख खान आदी मोठ्या कलाकारांसोबत ‘मोहब्बते’ सिनेमातही काम केले. पुढे त्याने ‘मेरे यार की शादी है’, ‘दिल है तुम्हारा’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘माई नेम इज खान’, ‘तनु वेड्स मनु’, ‘साहेब बीवी और गैंगस्टर’, ‘स्पेशल २६’, ‘फुगली’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’, ‘ए वेडनेसडे’, ‘यॉर होनर’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. जिमीने त्याच्या प्रभावी अभिनयाच्या जोरावत बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले.

जिम्मीच्या संपत्तीबद्दल सांगायचे झाल्यास त्याची एकूण ७६.१४ कोटींची संपत्ती असून, तो एका सिनेमासाठी १/२ कोटी रुपये मानधन घेतो. जिम्मीकडे आलिशान कारचे मोठे कलेक्शन आहे. त्याच्याकडे फरारी, रेंज रोव्हर आदी महागड्या गाड्या असून, सोबतच हार्ले डेविडसन बाईक देखील आहे. जिम्मीने २००१ साली त्याची गर्लफ्रेंड असलेल्या प्रियांकासोबत लग्न केले. त्यांना वीर नावाचा एक मुलगा देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-
ही दोस्ती तुटायची नाय! कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरची जोडी पुन्हा एकत्र; व्हिडिओ शेअर करत केली घोषणा
‘माचीस’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या जिम्मी शेरगीलने कॅरेक्टर भूमिकांमधून मिळवली तुफान प्रसिद्धी

हे देखील वाचा