व्हिडिओ: ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या मंचावर टेरेन्स लुईस पडला प्रेमात; सर्वांसमोर घेतले नोरा फतेहीला उचलून


बॉलिवूडमधील सगळ्यात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री आणि डान्सर म्हणजे नोरा फतेही. नोराने खूप कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये तिचे नाव कमावले आहे. तिची फॅन फॉलोविंगही कोट्यवधी आहे. आज प्रत्येकजण तिच्या उपडेटवर लक्ष ठेवत असतो. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय करते, याबाबत जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. त्यामुळे तिचे अनेक चाहते सोशल मीडियावर तिच्या पोस्टची वाट पाहत असतात. तिचे डान्स व्हिडिओ देखील खूप वेगाने व्हायरल होत असतात. असाच तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे, जेव्हा ती ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रियॅलिटी शोमध्ये गेली होती. या शोच्या मंचावर टेरेन्स लुईसने नोराला उचलून घेतले होते.

टेलिव्हिजनवरील रियॅलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’या मधून नेहमीच कोणता ना कोणता मजेशीर व्हिडिओ समोर येत असतात. तसेच अनेक वेळा परीक्षक देखील डान्स करताना दिसतात. अशातच यामधील टेरेन्स आणि नोराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सगळेजण नोराचे स्वागत करतात आणि तिला बसायला बोलावतात.

तेव्हा तिच्यासोबत मंचावर भारती सिंग, हर्ष लिंबाचिया आणि टेरेन्स लुईस असतात. त्यावेळी टेरेन्स तिला हाताला धरून बसायला नेत असतो. तेवढ्यात मागे ‘पेहला पेहला प्यार हैं’ हे गाणे वाजू लागते. हे गाणे लागताच टेरेन्स एकदम रोमँटिक होऊन जातो. तो नोरा सोबत डान्स स्टेप्स करतो आणि तिला उचलून घेऊन जातो.

यावेळी नोरा नेहमी प्रमाणेच खूप सुंदर दिसत होती. तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि काळ्या रंगाचे सॅंडल घातले आहेत. तसेच टेरेन्सने गुलाबी रंगाचा सूट घातलेला दिसत आहे.

नोरा फतेहीने या आधी ‘डान्स दीवाने’ या शोचे देखील परीक्षण केले आहे. यावेळी ती माधुरी दीक्षितच्या जागेवर परीक्षण करत होती. यावेळी देखील मंचावर त्यांची धमाल मस्ती पाहायला मिळाली होती. नोरा फतेही ही बेली डान्ससाठी प्रसिद्ध आहे. ती जिथे कुठे जाईल तिथे तिला सगळे डान्स करण्यास सांगत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट

-‘इंडियन आयडल १२’मध्ये ‘मेरे रश्के कमर’ गाणं गायल्याने सोनू कक्कर ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘मूळ गाण्याची…’


Leave A Reply

Your email address will not be published.