Wednesday, June 26, 2024

Sankarshan Karhade: ‘मिसळ खाल्ली अन्..…’, संकर्षणची ‘ती’ पोस्ट पाहून नेटकरी म्हणाले, ‘भुतासारखा माणुस…’

नाटक, चित्रपट (Movies) आणि छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे घराघरात लोकप्रिय ठरलेला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या कोकण (Konkan) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्याने लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान रत्नागिरीला भेट दिली. तसेच, रत्नागिरीतील प्रसिद्ध मिसळ आंबोळीचा आस्वादही घेतला. संकर्षण कऱ्हाडेने आपल्या इन्स्टाग्रामवर या दौऱ्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो रत्नागिरीतील ऐतिहासिक स्थळांना भेट देताना दिसत आहे. त्याने लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान, रत्नागिरी गणपती, रत्नागिरी किल्ला या ठिकाणांना भेट दिली.

संकर्षण कऱ्हाडेने पोस्ट (Sankarshan Kaharade Photos) करताना लिहिले की, ““रत्नागीरी” शहरांत आल्या आल्या दिवसाची सुरवात अशी झाली.लोकमान्यं टिळक जन्मस्थान आज मी पहिल्यांदाच पाहिलं.कित्ती छान वाटलं.मग शहरातली फेमस “मिसळ आंबोळी” खाल्ली.. वाह .. मज्जा आली …. आता आज रात्री 10 वा. प्रयोग तो ही खणखणीत होणार… ” तसेच त्याने प्रेक्षकांनी नाटक पाहण्यासाठी विनंती केली आहे.

संकर्षणच्या या पोस्टवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंट करताना एराने लिहिले की,”कुडाळच्या प्रयोगाची खूप वाट बघितली आम्ही….उद्या आहे आमच्या कुडाळ मध्ये प्रयोग…” दुसऱ्याने लिहिले की,”फोटो चांगला आहे. पण मगचा माणूस झूम करुण बघावा लागला, तो पर्यंत घाम फुटेल, काला कोट घातलेल्या भुतासारखा माणुस दियातोय.” असे म्हणत नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे. (Marathi Actor Sankarshan Karhade Konkan Tour Enjoying Ratnagiri Beach Food Share Post )

संकर्षण कऱ्हाडेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, संकर्षण कऱ्हाडेने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuchi Reshimgath)यांसारख्या मालिकेमध्ये काम केले आहे. त्याला ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमांमुळे त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली. सध्या तो ‘नियम व अटी लागू’ या नाटकामुळे चर्चेत आला आहे. संकर्षण सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून संकर्षण चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतो. (That post made by Sankarshan Kaharada after going on Konkan tour is in discussion)

आधिक वाचा-
Santosh Chordia Death | मराठी सिनेसृष्टीने गमावला आणखी एक हूरहुन्नरी कलाकार, संतोष चोरडिया यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन
Shocking! प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली भीषण आग; घरात अडकलेली महिला गभीर जखमी तर…

हे देखील वाचा