Saturday, February 14, 2026
Home टेलिव्हिजन द 50: अरबाज पटेल आणि प्रिन्स नरूला यांच्यात भांडण, होस्ट लायन यांनी स्पर्धकांना फटकारले

द 50: अरबाज पटेल आणि प्रिन्स नरूला यांच्यात भांडण, होस्ट लायन यांनी स्पर्धकांना फटकारले

यावर्षी नवीन आलेला रियालिटी शो आणि ज्याची खूप चर्चा आहे तो म्हणजे द 50 शो. शो ची संकल्पनेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या मध्ये विविध टास्क असतात, जे खेळाची रंगत वाढवतात. प्रत्येक भागात एक नवीन ट्विस्ट आहे.एका नवीन प्रोमोमध्येही असाच एक प्रसंग समोर आला आहे. प्रोमोमध्ये, प्रिन्स नरुला आणि अरबाज पटेल हे दोन स्पर्धक भांडताना दिसत आहेत. हा प्रोमो आता चर्चेत आहे आणि या भांडणानंतर “लायन” होस्ट अरबाज पटेलला बाहेर काढणार असल्याचे वृत्त आहे.

अभिनेत्री निक्की तांबोळीसह (Nikki tamboli)या शोमध्ये आहे. मिडीया वृत्तानुसार, काही काळापासून शोपासून दूर असलेली निक्की तांबोली परतली आहे आणि तिच्या परतल्यानंतर अरबाज आणि प्रिन्समधील तणाव वाढला आहे. निक्कीने अरबाजला सांगितले की प्रिन्सने त्रास दिला आहे, ज्यामुळे अरबाज रागावला आहे.

निक्की तांबोलीच्या दाव्यामुळे प्रिन्स आणि अरबाजमध्ये जोरदार वाद झाला. निक्कीने प्रिन्सचा सामना केला, तर अरबाजने वादाच्या वेळी आपल्या रागवर ताबा न ठेवता शारीरिकदृष्ट्या तो हिंसक झाला. असे म्हटले जात आहे की या वादाच्या वेळी अरबाजने प्रिन्सला थप्पड मारली, ज्यामुळे शोच्या अहिंसेच्या नियमाचे उल्लंघन झाले. त्यामुळे असे म्हटले जात आहे की अरबाजला शोमधून काढून टाकले जाऊ शकते.

मिडीया वृत्तानुसार, “द लायन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होस्टने या जोरदार वादानंतर अरबाजला शो सोडण्याचे निर्देश दिले, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीचा अचानक अंत झाला. मात्र, या दाव्यांमधील सत्यता आगामी एपिसोड प्रसारित झाल्यावरच कळेल. प्रिन्स नरुला आणि अरबाज पटेल यांच्यातील संघर्षाबाबत सोशल मीडियावर आता चर्चा सुरू आहेत. या वादाचा निकाल काय असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

शाहिद कपूरचा “ओ रोमियो” पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कसा राहिला? घ्या जाणुन

हे देखील वाचा