Tuesday, December 3, 2024
Home कॅलेंडर सोनू सूदकडे एकूण संपत्ती आहे तरी किती? फक्त ५५०० रुपये घेऊन आला होता मुंबईत

सोनू सूदकडे एकूण संपत्ती आहे तरी किती? फक्त ५५०० रुपये घेऊन आला होता मुंबईत

मागील वर्षापासून संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचे सावट पसरले आहे. या महामारीमुळे अनेक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले, तर काही स्थलांतरित झालेले लोक या काळात परिवारापासून दूर अडकून पडले होते. याच दरम्यान या अडचणीत सापडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी एक मदतीचा हात पुढे आला. हा हात म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (sonu sood) हा आहे. सोनू सूद  या सर्व लोकांचा देवदूत बनला. परंतु याच देवदूतावर सध्या एक संकट ओढवले आहे.

अभिनेता सोनू सूद हा मागील अनेक दिवसांपासून नेहमी चर्चेत आहे. परंतु सध्या सोनू हा त्याच्या चांगल्या कामामुळे नाही, तर आयकर विभागाच्या टीमने केलेल्या सर्वेक्षणामुळे चर्चेत आहे. आयकर विभागाने सोनू सूदचे उत्पन्न, खर्च आणि खात्याच्या तपशीलांची छाननी केली आहे. आयकर विभाग त्याच्या परिसरात पोहोचल्यानंतर त्याने ट्विटरवर ट्रेंड करणेही सुरू केले आहे. आयकर विभागाच्या सर्वेक्षणाबाबत युजर्सनी आपली मते मांडली आहेत. खरं तर, हे सर्वांना माहित आहे की, सोनू सूदने कोरोना व्हायरसदरम्यान लोकांना खूप मदत केली. त्याने असंख्य स्थलांतरित मजुरांना मदत केली होती. अशा स्थितीत सोनू सूदच्या मालमत्तेबाबत लोकांची आवडही वाढली आहे.

किती आहे सोनू सूदकडे मालमत्ता?
सोनू सूदने त्याच्या मेहनतीमुळे आणि क्षमतेमुळे मुंबईपासून पंजाबपर्यंत संपत्ती निर्माण केली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, सोनू सूद हा सुमारे १३० कोटीचा मालक आहे. त्याचबरोबर मुंबईत त्याचे आलिशान घर देखील आहे. गणपतीच्या पूजेसाठी घरात एक वेगळी जागा देखील केली आहे.

५५०० रुपये घेऊन आला होता मुंबईत
सोनू सूदबद्दल असे म्हटले जाते की, तो फक्त ५५०० रुपये घेऊन मुंबईमध्ये आला होता. त्याच्या संघर्षाच्या दिवसांत तो मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये १०० रुपयात प्रवास करत असे. सध्या मुंबईतील लोखंडवाला भागात त्याचे २६०० चौरस फूटांचे आलिशान ४ बीएचके घर आहे. ज्यामध्ये त्याने वास्तूनुसार इंटिरियर केले आहे. त्याचा जन्म ३० जुलै, १९७३ रोजी पंजाबच्या मोगा येथे झाला होता.

त्याचबरोबर सोनू सूदची पत्नी दक्षिण भारतीय आहे. त्याने १९९६ मध्ये सोनालीसोबत लग्न केले होते. त्यांची आणि सोनालीची अभियांत्रिकीच्या दिवसांत नागपुरात भेट झाली होती. त्यानंतर, अभिनयात करिअर करण्यासाठी तो तिच्यासोबत मुंबईला आला. सोनू सूदने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “तो गेल्या २० वर्षांपासून मुंबईत गणपती उत्सव साजरा करत आहे. गणपतीच्या आशीर्वादामुळेच तो गरिबांना मदत करू शकला आहे.” त्याचबरोबर आता पुढे काय होईल हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही नक्की वाचा-

अय्यो! एवढ्या महागड्या गाड्यांसोबत सोनू निगमाला आहे ‘या’ गोष्टींचा छंद

‘क्यूँकी सास भी कभी बहू थी’मधील ‘ही’ अभिनेत्री कमी वयातच झाली विधवा, हृद्यविकाराने पतीचे निधन

अरे बाप रे! आलिया भट्टला लागले चोरीचे डोहाळे? पाहा अभिनेत्रीने कशाची केली चोरी

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा