Saturday, April 20, 2024

‘क्यूँकी सास भी कभी बहू थी’मधील ‘ही’ अभिनेत्री कमी वयातच झाली विधवा, हृद्यविकाराने पतीचे निधन

टीव्ही इंडस्ट्रीतून वाईट बातम्या येत आहेत. ‘भाबी जी घर पर है’ मधील मलखान उर्फ ​​दीपेश भाननंतर (deepesh bhan) आता ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ अभिनेत्री केतकी दवेचे (ketaki bhan) पती आणि अभिनेता रसिक दवे (rasik dave) यांचे निधन झाले आहे. रसिक यांनी २९ जुलै २०२२ रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

माध्यमातील वृत्तानुसार, किडनी निकामी झाल्याने रसिक यांचा मृत्यू झाला. गेल्या दोन वर्षांपासून ते डायलिसिसवर होते. अभिनेता किडनीशी संबंधित आजाराशी झुंज देत होता. त्यांची किडनी सतत खराब होत राहिली आणि गेले एक महिना त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप वेदनादायक होता. ३० जुलै २०२२ रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ketki Dave ???? (@ketki_dave_)

 

केतकीचे लग्न टीव्ही अभिनेता रसिकसोबत झाले होते, ज्यांच्यापासून तिला रिद्धी दवे ही मुलगी आहे. रसिकने अनेक गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. रसिक यांनी ‘८२’ मध्ये गुज्जू चित्रपट ‘पुत्र वधू’ द्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली आणि गुजराती आणि हिंदी दोन्ही माध्यमात काम केले. यानंतर त्याने ‘मासूम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. केतकी आणि रसिक २००६ मध्ये ‘नच बलिये’मध्येही सहभागी झाले होते. अनेक वर्षे इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर रसिकने ‘संस्कार: धरोहर अपना की’ या टीव्ही मालिकेद्वारे इंडस्ट्रीत पुनरागमन केले. ‘ऐसी दिवांगी देखी नहीं कही’ या मालिकेतही तो दिसला आहे. रसिक आणि केतकी दवे यांनी गुजराती थिएटर कंपनीही चालवली.

त्याचबरोबर केतकी दवेबद्दल सांगायचे तर ती अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. याशिवाय ती गुजराती फिल्म इंडस्ट्रीचाही एक भाग आहे. तिची आई सरिता जोशी एक अभिनेत्री असून त्यांचे दिवंगत वडील प्रवीण जोशी हे देखील थिएटर दिग्दर्शक होते. तिला एक धाकटी बहीण पूरबी जोशी आहे, जी एक अभिनेत्री आणि अँकर देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अरे बाप रे! आलिया भट्टला लागले चोरीचे डोहाळे? पाहा अभिनेत्रीने कशाची केली चोरी

पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’ गोष्टी

दाऊद इब्राहिमसोबत अफेअरच्या चर्च्यांमुळे मंदाकिनी आल्या होत्या चर्चेत, ‘असे’ आले करिअरला वळण

हे देखील वाचा